मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /ज्याच्या नावाचा Tatoo काढला त्यानेच दिला प्रेमात धोका, ठाण्यात तरुणीने केली आत्महत्या

ज्याच्या नावाचा Tatoo काढला त्यानेच दिला प्रेमात धोका, ठाण्यात तरुणीने केली आत्महत्या

तरुणीने लग्नासाठी होकार दिल्यानंतर तिने घरच्यांनाही सूरजसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तिने त्याच्या नावाचं टॅटूही काढलं होतं.

तरुणीने लग्नासाठी होकार दिल्यानंतर तिने घरच्यांनाही सूरजसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तिने त्याच्या नावाचं टॅटूही काढलं होतं.

तरुणीने लग्नासाठी होकार दिल्यानंतर तिने घरच्यांनाही सूरजसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तिने त्याच्या नावाचं टॅटूही काढलं होतं.

ठाणे, 21 फेब्रुवारी : ठाण्यामध्ये प्रियकराने लग्नाला नकार दिल्यामुळे एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी सकाळी ठाण्यातील पाचपाखाडीमधील दांडेकरवाडी इथे ही घटना घडली आहे. तरुणी प्रियकराच्या प्रेमात ऐवढी बुडाली होती की तिने त्याच्या नावाचा टॅटू काढला होता. पण नंतर त्याने लग्नासाठी नकार दिल्यामुळे तरुणीने आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज शिर्के असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. 21 वर्षीय तरुणीची तिच्याच वयाच्या सूरज शिर्केसोबत मैत्री झाली आणि त्यानंतर सूरजने तरुणीला लग्नासाठी विचारलं. तरुणीने लग्नासाठी होकार दिल्यानंतर तिने घरच्यांनाही सूरजसोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तिने त्याच्या नावाचं टॅटूही काढलं होतं.

तरुणीने लग्नाचा आग्रह धरला असता सूरजने नकार दिला आणि नातं संपवलं. यानंतर नाराज झालेल्या तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी नौपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आला असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली प्रियकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या - वारिसला पठाण यांना '15 कोटीं'च वक्तव्य भोवलं, ओवेसींनी केली मोठी कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी खासगी क्लासेसमध्ये नोकरी करत होती. पण प्रियकराने लग्नासाठी नकार दिल्यामुळे ती चिंतेमध्ये होती. तिला हा नकार सहन झाला नाही आणि त्यानंतर तिने दांडेकरवाडी इथे राहणाऱ्या आत्याच्या घरी ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. बराच वेळ बेडरूममधून तरुणी बाहेर न आल्यामुळ कुटुंबियांना संशय आला. त्यांनी रुममध्ये जाऊन पाहिलं असता तरुणीचा मृतदेह आढळला.

इतर बातम्या - एसटी बसच्या धडकेत जीपचा चुराडा, 5 जणांचा जागीच मृत्यू

तात्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनसास्थळावरून तरुणीचा मृतेदह ताब्यात घेतला त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवला. तरुणीच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. तर आई वडिलांनी केलेल्या आरोपामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठाण्यातील टेकडी बंगला भागात राहणाऱ्या सूरज शिर्केवर दाखल करण्यात आला आहे.

First published: