लाडक्या लेकीनेच वडिलांना केलं ब्लॅकमेल, 2 कोटींसाठी केला नात्याचा विश्वासघात!

स्वत:चं अपहरण करून खंडणी मागण्यात आल्याचं तुम्ही अनेक सिनेमातून पाहिलं आहे. असंच सत्यात घडलं असल्यामुळे बापलेकीच्या नात्याला काळीमा फासण्यात आल्याची चर्चा आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 12:08 PM IST

लाडक्या लेकीनेच वडिलांना केलं ब्लॅकमेल, 2 कोटींसाठी केला नात्याचा विश्वासघात!

अमरेली (गुजरात) 28 सप्टेंबर : बापलेकीच्या सगळ्या प्रेमळ नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलीनेच वडिलांना फोन करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीने मित्राच्या मदतीने स्वत:चं अपहरण केलं आणि सोडवण्यासाठी वडिलांकडे 2 कोटी रुपये मागितल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर मुलीने रचलेला हा सापळा उद्ध्वस्त करत तिला आणि तिच्या आरोपी मित्राला ताब्यात घेतलं आहे.

स्वत:चं अपहरण करून खंडणी मागण्यात आल्याचं तुम्ही अनेक सिनेमातून पाहिलं आहे. असंच सत्यात घडलं असल्यामुळे बापलेकीच्या नात्याला काळीमा  फासण्यात आल्याची चर्चा आहे. मुलीने जास्त पैसे मिळवण्यासाठी फिल्मी स्टाईलने स्वत:चं अपहरण केले आहे. मित्राच्या मदतीने तिने स्वत:ला किडनॅप केलं आणि सोडवण्यासाठी वडिलांना धमकी दिली. त्यांच्याकडे खंडणीचे तब्बल 2 कोटी रुपये मागितले.

यानंतर घाबरलेल्या वडिलांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. वडिलांच्या सांगण्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीला पकडण्याचं प्लानिंग केलं. आरोपी तरुणीचे वडिल खंडणीचे पैसे देण्यासाठी गेले असता पैसे देण्याआधी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. आपल्या मुलीने असा प्लानिंग करत खंडणीचे 2 कोटी मागितले असल्याचं समजल्यानंतर वडिलांना धक्काच बसला.

ताब्यात घेतलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी मुलगी आणि तिच्या 2 मित्रांना ताब्यात घेतलं आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एकीकडे लेकीनेच वडिलांना फसवल्याचा प्रकार घडला असताना दुसरीकडे आईने डोळ्यांदेखल आपल्या मुलाचा जीव जाताना पाहिल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूरमध्ये घडला आहे.

इतर बातम्या - युती तुटली, शिवसेनेच्या या मतदारसंघात भाजपने दिला स्वबळावर लढण्याचा इशारा!

Loading...

प्लास्टिक कागदावरून पाय घसरून आईच्या डोळ्यांदेखतच शेततळ्यात मुलगा बुडाल्याची धक्कादायक समोर आली आहे. अभिजीत रामचंद्र आगवणे (वय-17) असे मृत मुलाचे नाव आहे. अभिजीतसोबत एका कामगाराचाही बुडून मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील काळाखोरा या भागात रामचंद्र आगवणे यांच्या शेतातील शेततळ्यात ही घटना घडली आहे.

मिळालेली माहिती अशी की, तळ्यातील पाणी कमी झाल्यामुळे कागद लिकिज काढण्यासाठी रामचंद्र आगवणे यांचा मुलगा अभिजीत रामचंद्र आगवणे आणि राजस्थानमधील कामगार सुरेंद्रसिंह (वय 25) हे दोघे शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दोरीच्या साह्याने शेततळ्यात उतरले होते. रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे प्लास्टिक कागदावरून सुरेंद्रसिंह याचा पाय घसरला आणि तो तळ्यामध्ये पडला शेजारीच उभा असलेल्या अभिजीतने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही पाण्यामध्ये पडले. हे सर्व दृश्य अभिजीतच्या आईच्या डोळ्यासमोर घडत होते. 'आई मला वाचव.. आई मला वाचव..' अशी आर्त हाक अभिजीत मारत होता. पण आई हतबल झाली, अखेर आईने स्वतःचा पदर अभिजीतच्या दिशेने फेकला. परंतु दोघेही तोपर्यंत बुडाले होते. हे वृत्त वाऱ्यासारखे खर्डी गावात पसरले. नागरिकांनी तळ्याकडे धाव घेतली. पाणी गढूळ झाल्यामुळे दोघांचा शोध घेणे अवघड झाले होते. अखेर बोरीच्या फांद्यां तळ्यात फिरवल्या अखेर सायंकाळी सातच्या सुमारास दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

इतर बातम्या - राजेंना मी गाडी-बंगला द्यायला तयार पण...; पवारांचा उदयनराजेंना टोला!

आईचा आक्रोश पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. अभिजीतच्या जाण्याने तो शिक्षण घेत असलेल्या सीताराम महाराज विद्यालयाने शाळा बंद ठेवली. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खर्डी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

CCTV VIDEO: मोबाईलच्या दुकानावर चोरांचा डल्ला, 17 लाखांचा मुद्देमाल लंपास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2019 12:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...