बलात्कार करू शकला नाही म्हणून जिवंत जाळलं, अखेर पीडितेने रुग्णालयात सोडला जीव

बलात्कार करू शकला नाही म्हणून जिवंत जाळलं, अखेर पीडितेने रुग्णालयात सोडला जीव

मागच्या 7 डिसेंबरला मुजफ्फरपूर जिल्ह्याच्या अहियापूर परिसरात बलात्काराच्या प्रयत्नात युवकाने त्याच्या मित्रासोबत मिळून युवतीला जिवंत जाळलं होतं.

  • Share this:

पटना, 17 डिसेंबर : न्यायासाठी लढता-लढता जिवंत जाळली गेलेली युवती अखेर आयुष्याची लढाई हरली आहे. सोमवारी रात्री उशीरा 11.40च्या दरम्यान पटनाच्या एका रुग्णालयात पीडितेने अखेरचा श्वास घेतला. हे प्रकरण पटनाच्या मुजफ्फरपूरच्या अहियापूरमधील आहे. हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण, उन्नाव बलात्कार प्रकरण, निर्भया प्रकरण अशा अनेक अत्याचाराच्या घटनांमुळे देशात संतापाची लाट असताना न्याय व्यवस्था मात्र ठिम्म आहे. अशात बलात्काराच्या संतापजनक घटना वारंवार समोर येत आहेत.

मागच्या 7 डिसेंबरला मुजफ्फरपूर जिल्ह्याच्या अहियापूर परिसरात बलात्काराच्या प्रयत्नात युवकाने त्याच्या मित्रासोबत मिळून युवतीला जिवंत जाळलं होतं. यानंतर पीडितेवर योग्य उपचार करण्यासाठी मागच्या 10 डिसेंबरला तिला पटनाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण न्यायाची लढाई लढणाऱ्या या पीडितेची आयुष्याची लढाई अखेर संपली आहे. सोमवारी रात्री तिचा रुग्णालयात मृत्यू झाला.

इतर बातम्या - लेकासारखा जावई झाला खूनी, सासऱ्याला कायमचं संपवून पत्नीसह सासूवरूही केला हल्ला

90 टक्के भाजली होती पीडिता

पीडित तरुणी जवळजवळ 95 टक्के भाजली होती, अशा परिस्थितीत तिची प्रकृती चिंताजनक होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा दिलमणी मिश्रा यांनीही पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पीडित तरुणी पाटण्यात आल्यानंतर पोलिसांनी तिला भेटून तिची चौकशी केली. आरोपी राजा राम राय आणि त्याच्या साथीदारांनी तिला जाळलं असल्याचं पीडितेने पोलिसांसमोर सांगितलं आहे.

आरोपी 5 वर्षांपासून देत होता त्रास

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण राजा गेल्या 5 वर्षांपासून सतत मानसिक अत्याचार करत होता. यासंदर्भात कुटुंबीयांनी स्थानिक अहियापूर पोलीस ठाण्यात अनेकदा न्यायाची मागणी केली होती. कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणात थेट पोलिसांवर आरोप केले आणि सांगितले की पोलिसांनी या प्रकरणात त्वरित कारवाई केली असती तर या घटनेस रोखता आलं असतं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी युवक राजाला अटक करुन तुरूंगात पाठवलं आहे.

इतर बातम्या - धक्कादायक; मुंबईच्या गर्दीने घेतला तरुणीचा जीव, क्षणात झालं होत्याचं नव्हतं!

सगळी स्वप्न अपूर्णच राहिली

पीडित तरुणी नर्सिंगची ट्रेनिंग घेऊन लोकांची सेवा करणार होती. तिचं हे स्वप्न होतं. पण सोमवारी तिच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरलं. तिच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bihar News
First Published: Dec 17, 2019 09:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading