VIDEO: विद्यार्थिनीची रोडरोमिओनं काढली छेड; स्थानिकांनी केली धुलाई

नागपूर, 19 जुलै: मैत्री करण्यासाठी मुलीवर वारंवार दबाव टाकणाऱ्या आणि छेड काढणाऱ्या तरुणाला लोकांनी चांगलाच चोप दिला. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनीनेही आपला दुर्गावतार दाखवत छेडणाऱ्याच्या कानशिलात लगावली. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर बस स्थानकात आज ही घटना घडली. यावेळी छेड काढणाऱ्या युवकाची नागरिकांच्या मदतीने बेदम धुलाई करुन, त्याला कळमेश्वर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. नागपूरातील गोधनी परिसरात राहणारा संदीप निंबूरकर असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर बसस्थानकावर घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.