'यापुढे दूध भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेपेची शिक्षा'

'यापुढे दूध भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेपेची शिक्षा'

दूध आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाणार आहे. तसे कायदा बदल करून, तसं विधेयक सभागृहात मांडण्यात येणार असल्याची घोषणा अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी केली.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : दूध आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना यापुढे जन्मठेपेची शिक्षा होणार आहे. त्यासाठी कायदा केला जाणार असून तसं विधेयक लवकरच सभागृहात मांडलं जाईल, अशी घोषणा अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी आज विधीमंडळात केली.

विधानमंडळात प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बापट यांनी दूध भेसळीचा गुन्हा हा लवकरच अजामीनपात्र करण्यात येईल, असं सांगितलं.

याआधी हा गुन्हा अदखलपात्र होता. तसंच, गुन्ह्याची शिक्षा ही फक्त सहा महिन्यांपर्यंतच होती. त्यामुळे दूध आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांना या कायद्याचा अजिबात धाक नव्हता. मात्र, यापुढं हा गुन्हा दखलपात्र नसेल, असं गिरीश बापट म्हणाले.

लवकरच या संदर्भातला कायदा आणखी कठोर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन गुन्हेगाराला किमान सहा महिन्यांपासून ते जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा सुनावण्यात येईल, असंही बापट यांनी स्पष्ट केलं.

कायद्यात बदल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायासयाने दिल्या होत्या सूचना

दूध भेसळीला आळा घालाण्यासाठी सर्वोच्च न्यायासयाने कठोर भूमिका घेत, भेसळयुक्त दुधाचे उत्पादन किंवा व्यापार करणार्‍यांला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात यावी आणि त्यासाठी राज्य सरकारांनी कायद्यात आवश्यक त्या सुधारणा कराव्या अशा सूचना डिसेंबर 2017 मध्ये सर्व राज्यांना केल्या होत्या.

अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार सध्या दुधाची भेसळ करणाऱ्यांना 6 महिन्यांची शिक्षा ठोठावली जाते पण ती कमी असल्याचं न्यायालयाने म्हटलं होतं. देशभरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध विकले जात असल्याच्या जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता.

 VIDEO : मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढावीच लागेल - मुख्यमंत्री

First published: November 22, 2018, 5:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading