'विधानसभेत चर्चाच होऊ नये असं बारामतीकरांना वाटतं?'

'विधानसभेत चर्चाच होऊ नये असं बारामतीकरांना वाटतं?'

बारामतीत मुख्यमंत्री चषक खेलो या क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभात बोलताना गिरीश बापटांनी अजित पवारांवर साधला निशाणा.

  • Share this:

बारामती, 18 नोव्हेंबर : बारामतीत मुख्यमंत्री चषक खेलो या क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभात बोलताना गिरीश बापटांनी अजित पवारांवर निशाणा साधला. ''विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. संसदीय कामकाज मंत्री म्हणून चांगली चर्चा घडावी असा माझा प्रयत्न असतो. मात्र, विधानसभेत चर्चाच होऊ नये असं बारामतीकरांना वाटतं? असा टोला गिरीश बापट यांनी अजित पवारांना लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ''आमच्या सरकारने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री चषक खेलो महाराष्ट्र अभियान सुरू केलं आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या खेळाच्या स्पर्धा घेण्यात येत आहेत. उत्तम खेळाडू तयार व्हावेत या उद्दिष्टाने या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. त्यातून युवापिढीला वाव मिळत असून, मुख्यमंत्री चषकाच्यामाध्यमातून त्यांना चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. निश्चितच यातून चांगले खेळाडू तयार होतील'' असा विश्र्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारने सुरू केलेल्या मुख्यंत्री चषक स्पर्धेवर विरोधक कडाडून टीका करत आहेत. ते सद्या नैराश्यात आहेत, त्यामुळे त्यांना टिका करू द्या. कारण, त्यांना आता दुसरे काही कामच उरलं नसल्याचा टोला त्यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला.

यापूर्वी असंही म्हटलं होतं बापटांनी..

एप्रिल महिन्यात पुण्याजवळील कार्ला येथे पार पडलेल्या एका मेळाव्यात त्यांनी,  ''शिवसेना आपला मित्रपक्ष आहे त्यातले कार्यकर्ते भाजपमध्ये आले तर चालतील. पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नकोत. राष्ट्रवादीच्या सडक्या आंब्यांमुळे आपल्या पक्षाचे आंबेही सडतील'', असं विधान केलं होतं.

 VIDEO : ...जेव्हा फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार दीपवीर पोझ देतात

First published: November 18, 2018, 8:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading