माणूस की भूत? रस्ता ओलांडताना गाड्यांच्या आर-पार घुसला तरुण, नेमका काय प्रकार पाहा CCTV VIDEO

माणूस की भूत? रस्ता ओलांडताना गाड्यांच्या आर-पार घुसला तरुण, नेमका काय प्रकार पाहा CCTV VIDEO

ही कसली भुताटकी? रस्ता क्रॉस करताना गाड्यांच्या मधून गेला तरुण, पाहा काळजात धडकी भरवणारा VIDEO

  • Share this:

मनीला, 11 डिसेंबर : रस्ता ओलांडताना आपण गाड्यांची धडक बसणार नाही किंवा कोणतीही दुर्घटना घडणार नाही ना? याची काळजी आपल्या बाजूनं घेत असतो. पण एक व्यक्ती भरधाव जाणाऱ्या गाड्यांमधून रस्ता ओलांडताना दिसत आहे. ही धक्कादायक घटना रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि एकच खळबळ उडाली.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता गाड्या सुसाट वेगानं जात असताना हा व्यक्ती रस्ता ओलांडत आहे. रस्ता ओलांडताना हा व्यक्ती व्हिडीओमध्ये गाड्यांच्या आरपार जाऊन रोड क्रॉस करत आहे. गाड्यांची धडक त्याला बसत नाही तर गाडीच्या आरपार हा तरुण जात असल्याचं या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे. द सन या स्थानिक मीडियावर याचा सीसीटीव्ही व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खूप खळबळ उडाली.

हे वाचा-शेतकरी आंदोलनामुळे इंडिगो कर्मचाऱ्यांची धांदल; करावा लागला पायी प्रवास

'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आल्यानंतर शहरातील या भागातील लोक चांगलेच घाबरले आहेत. व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की ही रहस्यमय सावली एल लॉरी, दोन कार आणि मोटरसायकलच्यामधून पुढे जात आहे. या व्यक्तीला कोणीच पाहात नाही असा दावा देखील करण्यात आला आहे. ही घटना फिलिपाइन्स इथल्या पेन्गासिनन या भागात घडल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचा-संगीताची जादू! 4 महिन्यांपासून होती कोमात, गाणं ऐकताच शुद्धीवर आली

ही व्यक्ती डिलिव्हरी बॉयच्या अगदी जवळून रस्ता क्रॉस होताना दिसत आहे. ज्याचं नाव मायकल फोर्टो असं आहे. तो म्हणतो की हा व्हिडीओ जेव्हा मी बघते तेव्हा माझ्या अंगावर शहारा येतो. अशा घटना आतापर्यंत चित्रपटातच पाहिल्या आहेत. जेव्हा जेव्हा मी त्या परिसरात डिलिव्हरी देण्यासाठी जातो तेव्हा कोणीतरी मला पाहात असल्याचं जाणवतं अशी भीतीही तो व्यक्त करतो.

या व्हिडिओमध्ये माणसाच्या सावलीसारखं काहीतरी दिसत आहे. जे रस्ता ओलांडून जात असताना गाड्यांमधून जात आहे. या सावलीला दोन पाय देखील दिसत आहे. सोशल मीडियावर अनेकांनी ग्राफिक्स किंवा हा व्हिडीओ एडिट केल्याचा दावा देखील केला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 11, 2020, 9:54 AM IST

ताज्या बातम्या