मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बायकोला इंप्रेस करण्यासाठी नवऱ्याने पहिल्यांदाच केली चोरी आणि...!

बायकोला इंप्रेस करण्यासाठी नवऱ्याने पहिल्यांदाच केली चोरी आणि...!

पत्नीला इंप्रेस करण्यासाठी दरोडा टाकणाऱ्या पतीला पोलिसांनी 5 दरोडेखोरांसह अटक केली. ते पाच बावरिया टोळीचे सदस्य आहेत.

पत्नीला इंप्रेस करण्यासाठी दरोडा टाकणाऱ्या पतीला पोलिसांनी 5 दरोडेखोरांसह अटक केली. ते पाच बावरिया टोळीचे सदस्य आहेत.

पत्नीला इंप्रेस करण्यासाठी दरोडा टाकणाऱ्या पतीला पोलिसांनी 5 दरोडेखोरांसह अटक केली. ते पाच बावरिया टोळीचे सदस्य आहेत.

  • Published by:  Renuka Dhaybar

गाजियाबाद, 06 जानेवारी : माहेरी गेलेल्या पत्नीला परत बोलवण्यासाठी आणि तिला इंप्रेस करण्यासाठी पतीने चोरी करण्याचं ठरवलं. त्यानंतर असं काही झालं ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पत्नीला इंप्रेस करण्यासाठी दरोडा टाकणाऱ्या पतीला पोलिसांनी 5 दरोडेखोरांसह अटक केली. ते पाच बावरिया टोळीचे सदस्य आहेत. खरंतर पत्नीच पतीला चोरी करण्यासाठी सांगायची अशी धक्कादायक माहिती या प्रकरणात समोर आली आहे.

पोलीस चौकशी दरम्यान, आरोपी पती अमितने सांगितले की, 'मी चोऱ्या करायचो नाही म्हणून पत्नी मला सोडून गेली होती. मी खरंतर कधी चोरी केली नाही. छोटी-मोठी काम करून मी घर चालवत होतो. पण जास्त पैशांसाठी पत्नी मला चोरी करायला सांगायची आणि मी चोरी नाही केली म्हणून ती मला सोडून माहेरी गेली होती.'

पत्नीला परत घरी आणण्यासाठी पतीने चोरी केली असल्याची कबुली त्याने पोलिसांत दिली. पत्नीला परत आणण्यासाठी अमित गौतम बुद्ध नगरच्या बावरिया टोळीचा मास्टरमाईंडला भेटला आणि लुटण्यासाठी बाहेर गेला. रविवारी रात्री सिहानी गेट पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

इतर बातम्या - काँग्रेसला सोडून शिवसेनेनं हाती घेतलं कमळ, या जिल्ह्यात दिला भाजपला पाठिंबा

संपूर्ण कुटुंब करतं गुन्हेगारी

सिहानी गेट पोलीस स्टेशनचे प्रभारी गजेंद्रपाल सिंह यांनी सांगितले की, पोलीस पथक अपेक्स रुग्णालयाजवळ तपासणी करत होतं. यावेळी, काही संशयित रिकाम्या मैदानावर दिसले, त्यांची ओळख बावरीया टोळी आहे. हे पाच जण एका घटनेची योजना आखत होते. पोलिसांनी घेराव घालून पाच जणांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम बुद्ध नगर येथील शिवराम आणि सोनू, भोजपूर येथील अमित आणि टिळकू व हापूर येथील विकास अशी या दुचाकीस्वारांची नावे आहेत.

इतर बातम्या - JNU हिंसाचारामागे भाजपचा हात होता, रोहित पवारांचा घणाघाती आरोप

आरोपी शिवराम हा टोळी चालवत होता. त्यांनी नोएडा, मेरठसह अनेक ठिकाणी लूटमार केली. अटक करण्यात आलेल्या अमितने धक्कादायक खुलासे केल्याचे पोलीस स्टेशन प्रभारी म्हणाले. त्याने सांगितले की त्याच्या कुटुंबातील सर्व लोक असा गुन्हा करतात, त्याने तसे केले नाही, यामुळे त्याची पत्नी निघून गेली. तो पत्नीला परत आणण्यासाठी टोळीसह आला होता.

इतर बातम्या - हेअर ड्रायर आणि इस्त्री वापरणाऱ्यांवर भडकला गांगुली, BCCI करणार कारवाई

First published: