संशयामुळे झाला संसार उद्धवस्त; पत्नीसह 3 मुलांचा केला खून

पत्नी संशय घेते म्हणून पतीनं पत्नीसह 3 मुलांचा खून केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2019 09:16 AM IST

संशयामुळे झाला संसार उद्धवस्त; पत्नीसह 3 मुलांचा केला खून

लखनऊ, 05 जुलै : उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी संशय घेते म्हणून पतीनं पत्नीसह 3 मुलांचा खून केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पण, फार उशीर झाला होता. कारण, 3 मुलांसह पतीचा मृत्यू झाला होता. तर, पत्नी मात्र गंभीर अवस्थेत होती. दरम्यान, पत्नीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून पतीसह तिन मुलांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं आहे. घटनास्थळी चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये पत्नी सतत संशय घेते म्हणून आपण ठोकाचं पाऊल उचलत असल्याचं म्हटलं आहे. सध्या या साऱ्या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. प्रदीप असं या व्यक्तीचं नाव आहे.

Loading...

काय आहे प्रकार

शताब्दीपुरम परिसरात 42 वर्षाचा प्रदीप आपल्या कुटुंबासह राहत होता. प्रदीपची पत्नी संगीता सतत प्रदीपवर संशय घेत होती. त्यामुळे दोघांमध्ये भांडणं देखील होत होती. अखेर एका रात्री प्रदीप आणि पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर प्रदीपनं पत्नी आणि तीन मुलांची हत्या केली. मुलांच्या ओरडण्याचा आवाज खोली बाहेर जाऊ नये म्हणून त्यानं मुलांची तोंड बांधून घेतली. त्यानंतर त्यानं पत्नीसह 3 मुलांचा जीव घेतला आणि स्वत:ला देखील संपवलं. यामध्ये प्रदीपसह 3 मुलांना आपला जीव गमवावा लागला असून पत्नी संगीता गंभीर अवस्थेत आहे. तिच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मनस्वी ( 8 वर्षे ), यशस्वी ( 5 वर्षे ) आणि ओजस्वी ( 3 वर्षे ) अशी या मुलांची नावं आहेत.

पोलिसांना केलं पाचारण

प्रदीपचे आई, वडील आणि बहिण देखील एकाच घरी राहत होते. सकाळी बराच वेळ खोलीचा दरवाजा उघडला न गेल्यानं त्यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. पण, कोणताही प्रतिसाद येत नव्हता. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीनं खिडकीतून खोलीत पाहिल्यानंतर समोरचं दृश्य अंगावर शहारे आणणारं होतं. त्यानंतर पोलिसांना पाचारण करत खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. सध्या पोलीस साऱ्या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

बाई तुम्ही सुद्धा! पाचव्या पतीने केला महिलेच्या कारनाम्याचा पर्दाफाश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2019 09:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...