Home /News /news /

हादरवणारी महिलेची कहाणी, 5 वर्षात 16 जणांनी केला बलात्कार

हादरवणारी महिलेची कहाणी, 5 वर्षात 16 जणांनी केला बलात्कार

2011पासून पीडिता बलात्काराच्या जाळ्यात अडकली जेव्हा तिच्या जन्मदात्या पित्याने तिला 10 हजार रुपयांमध्ये विकलं होतं.

    लखनौ, 14 मे : 'मेल्यानंतर माझ्यावर कुणी बलात्कार करणार नाही,' असं म्हणत पीडित महिलेनं स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर मंगळवारी समोर आली होती. या महिलेला तिच्या वडिलांनी विकलं होतं. उत्तर प्रदेशातील हापुड इथली ही घटना आहे या प्रकरणात आता एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये पीडित महिलेवर 16 जणांनी बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्याच बरोबर यातील एक पुरुषाकडून महिलेला बाळ झाल्याचंही सांगण्यात येत आहे. 2011पासून पीडिता बलात्काराच्या जाळ्यात अडकली जेव्हा तिच्या जन्मदात्या पित्याने तिला 10 हजार रुपयांमध्ये विकलं होतं. ज्याने महिलेला विकत घेतलं त्याने नंतर तिच्याशी विवाह केला. जन्मदात्या पित्यानेच या महिलेला विकून टाकलं. त्यानंतर तिच्यावर अनेकदा सामुहिक बलात्कार झाला. या सगळ्याला कंटाळून तिनं 28 एप्रिल रोजी स्वत:ला पेटवून घेण्याचं टोकाचं पाऊल उचललं आहे. ही महिला 80 टक्के भाजली असून सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ज्यातून पीडित महिलेने मन हेलावून टाकणारं सत्य सांगितलं आहे. हेही वाचा : गायब झालेल्या पतीला पाहून पत्नी भडकली, नवऱ्याला मारतानाचा VIDEO व्हायरल पीडितेने एफआयआरमध्ये म्हटलं की, 'माझं दुसरं लग्नदेखील करण्यात आलं होतं. त्यानंतर मला एक मुलगा झाला होता. माझ्या परिस्थितीचा फायदा घेत माझ्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. मला गावासमोर बदनाम केलं जाईल अशा धमक्या दिल्या जायच्या. बलात्कारानंतर मी तिसऱ्या मुलालाही जन्म दिला होता.' 'आता माझ्यावर बलात्कार होणार नाही' 'मला मरायचं आहे. असलं दु:ख कुणाच्याही वाट्याला येऊ नये. पण आता माझ्यावर कमीत कमी बलात्कार तरी होणार नाही. कारण माझं शरीर जळून गेलं आहे,' असं या महिलेनं एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं आहे. 'माझा दुसरा नवरा त्याच्या मित्रांसोबत येऊन माझ्यावर बलात्कार करायचा. याबाबात मी ऑक्टोबर 2018 मध्ये पोलिसांकडे तक्रारही नोंदवली होती. पण आतापर्यंत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही,' असा आरोपही उपचार घेत असलेल्या या महिलेनं केला आहे. काय आहे प्रकरण? सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या महिलेनं उत्तर प्रदेशातील आपल्या घरी पेटवून घेतलं. त्यानंतर या महिलेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तिनं तिची कहानी सांगितली आहे. यामध्ये संबंधित महिलेनं दावा केला होता की, तिच्या वडिलांनी 10 हजार रुपयांना तिला विकलं होतं. सगळीकडे निराशा झाल्याने या महिलेनं स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. VIDEO: 'तू झक्कास दिसतेस' म्हणताच तरुणीने युवकाला चपलेनं धुतलं
    First published:

    Tags: Rape case, Up crime news, Up Police

    पुढील बातम्या