Ghatkopar Plane Crash :'ती'ने नकार दिला होता,पायलट मारियाच्या पतीचा आरोप

Ghatkopar Plane Crash :'ती'ने नकार दिला होता,पायलट मारियाच्या पतीचा आरोप

तसंच विमानात बिघाड झाल्यानंतर ईमरजन्सी लँडिंगसाठी परवानगी देखील मिळाली होती.

  • Share this:

मुंबई, 28 जून : घाटकोपर विमान दुर्घटना ही युव्हाय एव्हिएशन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा खळबळजनक आरोप या दुर्घटनेतील मृत वैमानिक मारिया यांच्या पतीनं केलाय.

मारिया यांनी हवामान खराब असल्याचं सांगत उड्डाणासाठी नकार दिला होता. मात्र त्यांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करून एव्हिशन कंपनीनं चाचणी उड्डाणाचा निर्णय घेतल्याचा आरोप मारियाचे पती प्रभात कथुरिया यांनी केलाय.

मोठी दुर्घटना टाळण्यासाठी पायलटनं स्वीकारला मृत्यू

तसंच विमानात बिघाड झाल्यानंतर ईमरजन्सी लँडिंगसाठी परवानगी देखील मिळाली होती. मात्र रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान कोसळल्याची माहिती देखील कथुरियांनी दिलीय.

घाटकोपरमध्ये सर्वोदय रुग्णालय परिसरात जीवदया नगरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलंय. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. अवघ्या अर्ध्या तासात होत्याचं नव्हतं झालं.

दुपारी एक वाजता हे विमान जुहूवरून पायलट, को-पायलट  आणि 2  तंत्रज्ञ असे एकूण चार जणांना घेऊन उड्डाण भरलं. अर्ध्या तासानंतर घाटकोपर पश्चिम परिसरात जागृती पार्क जवळ जीवदया लेनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या परिसरात हे चार्टर्ड विमान कोसळलं.या दुर्घटनेत  रस्त्यावरून गाडीवर जाणाऱ्या एकाचाही मृत्यू झालाय. तर 21 वर्षांचा लवकुश कुमार आणि 24 वर्षांचा नरेश कुमार निशाद हे दोन तरुण जखमी झालेत.

हेही वाचा

स्विस बँकेतल्या भारतीयांच्या पैशात झाली वाढ

VIDEO : विमान कोसळण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

कपिल पाटील यांची विजयाची हॅट्ट्रिक,भाजप-सेना पराभूत

First published: June 28, 2018, 10:59 PM IST

ताज्या बातम्या