S M L

Ghatkopar Plane Crash : 300 मिटर अंतर अपुरे पडले, मृत्यूने गाठले

माणिकलाल मैदान रनवे चॅनलच्या मार्गातच असून, दुर्घटना स्थळ फक्तं ३०० मिटर आधी आहे.

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2018 11:40 PM IST

Ghatkopar Plane Crash : 300 मिटर अंतर अपुरे पडले, मृत्यूने गाठले

मुंबई, 28 जून : घाटकोपर विमान दुर्घटना ही शेवटच्या क्षणापर्यंत टाळता आली असती तसा प्रयत्न विमानाच्या पायलट आणि को-पायलटने केला पण यात त्यांना यश आलं नसल्याची माहिती समोर आलीये.

चार्टर्ड प्लेनचं शेवटच्या क्षणी इमर्जन्सी लँडिंग जवळच्याच मोठ्या माणिकलाल मैदानात करण्याचं पायलट आणि को-पायलट चा प्रयत्न होता. मात्र माणिकलाल मैदानावर पोहचण्याआधीच विमान दुर्घटनाग्रस्तं झालं. दुर्घटना स्थळापासून माणिकलाल मैदान अवघ्या ३०० मीटर अंतरावर आहे.

मुंबई विमानतळाच्या लँडिंग चॅनलमध्ये चार्टर्ड प्लेन आल्या नंतर प्लेन अनियंत्रित झालं. त्याही परिस्थित रनवे च्या आधीच जवळ असलेल्या माणिकलाल मैदानात चार्टर्ड प्लेन उतरवण्याचा प्रयत्नं यशस्वी झाला असता तर परिस्थिती वेगळी असती.

हेही वाचा

स्विस बँकेतल्या भारतीयांच्या पैशात झाली वाढ

Loading...
Loading...

VIDEO : विमान कोसळण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

कपिल पाटील यांची विजयाची हॅट्ट्रिक,भाजप-सेना पराभूत

माणिकलाल मैदान रनवे चॅनलच्या मार्गातच असून, दुर्घटना स्थळ फक्तं ३०० मिटर आधी आहे. विमानाच्या ब्लॅक बाॅक्स मधील फ्लाईट डेटा रेकाॅर्डची तपासणी सुरू आहे. त्यातून काय माहिती मिळते हे महत्त्वाचं ठरणार आहे.

आज दुपारी 1.30 च्या सुमारास घाटकोपरमध्ये सर्वोदय रुग्णालयाजवळ हे चार्टर्ड विमान कोसळलं. या दुर्घटनेत पायलट, को पायलट, तंत्रज्ञ आणि रस्त्यानवरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. तर 21 वर्षांचा लवकुश कुमार आणि 24 वर्षांचा नरेश कुमार निशाद हे दोन तरुण जखमी झाले होते.

सर्वोदय लेनजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर हे विमान पडलं. पण ज्यावेळी विमान पडलं त्यावेळी दुपारच्या जेवणासाठी कामगार गेले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

विमान पडल्यानंतर संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आलाय.हे चार्टर्ड विमान जुहू येथून टेस्टिंगसाठी निघालं होतं.

मुळात उत्तर प्रदेश सरकारचं असलेलं हे विमान मुंबईतल्या यूवाय एविएशनला विकण्यात आलं होतं. या आधीही या विमानाला अलाहाबादमध्ये अपघात झाला होता, अशी माहिती उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव अवनीश अवस्थी यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2018 11:40 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close