मुख्यमंत्री फडणवीसांना भंगारातली विमानं ?

मुळात युवाय एव्हिएशनने काल अपघात झालेले सी-९० आणि बेल-२३० हे उत्तर प्रदेश सरकारकडून भंगाराच्या भावात विकत घेतले होते.

Sachin Salve | Updated On: Jun 29, 2018 08:42 PM IST

मुख्यमंत्री फडणवीसांना भंगारातली विमानं ?

मुंबई, 29 जून : घाटकोपरमध्ये चार्टर्डविमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. मुळात या सगळ्या अपघाताला युवाय एव्हिएशनचा अत्यल्प अनुभव असल्याचं पुढे येतंय. याच एव्हिएशन कंपनीने राज्याते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हेलिकॉप्टर सेवा पुरवली होती. अलिबाग आणि गडचिरोली अपघातात मुख्यमंत्री बचावले तेव्हा ते युवाय एव्हिएशन कंपनीचेच हेलिकॉप्टर होते.

२०१५ ला सुरू झालेल्या युवाय एव्हिएशननं प्रत्यक्षात दोन वर्षापूर्वी एअरक्राफ्ट उडवायला सुरूवात केली. मात्र सुरुवातीपासूनच अनुभवाच्या कमतरतेमुळे या कंपनीच्या हेलिकॉप्टरला अपघाताचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा याच कंपनीच्या बेल-२३० या हेलिकॉप्टरमधून दोन वेळा बचावले.

मुख्यमंत्री बचावले

- १३ मे २०१७ ला गडचिरोली दौऱ्यावर बेल-२३० चे इंजिन बंद पडले

- ७ जुलै २०१७ ला अलिबागमध्ये बेल-२३० मुख्यमंत्री बसायच्या आतच सुरू झाले

मुळात युवाय एव्हिएशनने काल अपघात झालेले सी-९० आणि बेल-२३० हे उत्तर प्रदेश सरकारकडून भंगाराच्या भावात विकत घेतले होते. उत्तर प्रदेशातून हे दोन्ही एअरक्राफ्ट चक्क कंटेनरमधून लोड करुन मुंबईत आणण्यात आले होते.

उत्तरप्रदेश सरकारनं मोडीत काढलेल्या एअरक्राफ्टमधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री प्रवास करतात. हेलिकॉप्टरचा दोनवेळा अपघात टळून मुख्यमंत्री बचावतात. तरीही या कंपनीवर कुठलेही निर्बंध येत नाही. मुख्यमंत्र्यांच्या अपघातानंतर या कंपनीवर वेळीच कारवाई केली असती तर पाच जणांचा जीव वाचला असता. हे तितकच खरं आहे.

मुळात मंत्रालयीन अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करत, राजकीय पाठबळावर ही कंपनी उभी झालीय असा आरोप विरोधकांकडून होतोय. कंपनीला नियमबाह्य परवानग्यांच्या मोबदल्यात मुख्यमंत्र्यांना ही विमानसेवा पुरवण्यात येत होती का? असा सवालही विरोधकांनी उपस्थित केलाय.

या सगळ्याप्रकारनंतर सरकार आतातरी युवाय एव्हीएशनवर ठोस कारवाई होणं गरजेचं आहे.

हेही वाचा

विमा कंपन्यांनी कमावले 10 हजार कोटी, शेतकरी मात्र कंगालच !

VIDEO : 'ते' दोघे आणि विमान कोसळतानाचा 'तो' थरारक क्षण

 VIDEO : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण

अश्विनी बिद्रेंच्या मारेकऱ्याचं नाव पोलीस बढतीच्या यादीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 29, 2018 08:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close