FIFA WC 2018 : गतविजेत्या जर्मनीचा खेळ खल्लास !

जर्मनी ही युरोपमधील चौथी टीम आहे जी मागील वर्ल्डकप जिंकून पुढील वर्ल्डकपमध्ये पहिल्याच फेरीत बाहेर पडलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2018 10:24 PM IST

FIFA WC 2018 : गतविजेत्या जर्मनीचा खेळ खल्लास !

रशिया, 27 जून : फीफा वर्ल्डकप 2018 मध्ये गतविजेती जर्मनी टीमला पराभवाला सामोरं जावं लागलंय. साऊथ कोरियाने जर्मनीचा 2-0 ने पराभव केल्यामुळे जर्मनी वर्ल्डकपमधून बाहेर पडलीये.

आज ग्रुप एफमध्ये साऊथ कोरिया आणि जर्मनीत सामना रंगला. साऊथ कोरियाकडून किम योंग ग्वोन आणि सन हियुंग मिनने प्रत्येकी 1-1 गोल करून जर्मनीला बाहेरचा रस्ता दाखवला. तर दुसरीकडे याच ग्रुपमध्ये मेक्सिकोला 3-0 ने पराभूत करून स्वीडनने प्री क्वार्टरफायनलमध्ये जागा मिळवलीये.

जर्मनीचा फ्लाॅप शो

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये जर्मनीचा सर्वात खराब खेळी केली. जर्मनीची टीम पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडलीये. जर्मनी ही युरोपमधील चौथी टीम आहे जी मागील वर्ल्डकप जिंकून पुढील वर्ल्डकपमध्ये पहिल्याच फेरीत बाहेर पडलीये.

1998 ला फ्रांसने वर्ल्डकप जिंकला होता पण 2002 ला पहिल्याच फेरीत फ्रांस बाहेर पडली होती. त्यानंतर 2006 ला इटली चॅम्पियन ठरली होती पण 2010 मध्ये बाहेर पडली होती. तर स्पेन 2010 मध्ये वर्ल्डकप जिंकला होता आणि 2014 मध्ये ग्रुप स्टेजमधून बाद झाली होती. आता जर्मनीसोबत सुद्धा असंच घडलंय. जर्मनी मेक्सिकोसोबत पहिला सामना पराभूत झाली होती त्यानंतर साऊथ कोरियाने जर्मनीला बाहेरचा रस्ता दाखवले असं कुणालाच वाटलं नव्हतं.

हेही वाचा

 'मल्टिप्लेक्समध्ये 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांमध्ये विकण्याचा अधिकार कुणी दिला?, मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं

लातूर : अविनाश चव्हाणवर गोळ्या झाडणारा आरोपी संभाजी पाटील निलंगेकरांचा माजी सुरक्षारक्षक!

 दागिने घालून फिरताय? सावधान, पुण्यात 11 महिलांची मंगळसूत्रं लंपास

 'भांडखोर बायको नको रे यमराजा',पुरुषांनी वडाला मारल्या उलट्या फेऱ्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 10:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...