स्पेशल रिपोर्ट : जर्मनीनं दिली समलिंगी विवाहांना मान्यता

युरोपियन देशांच्या तुलनेत हा निर्णय घेण्यासाठी जर्मनीनं बराच वेळ लावला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2017 07:22 PM IST

स्पेशल रिपोर्ट : जर्मनीनं दिली समलिंगी विवाहांना मान्यता

 

अमेय चुंभळे, मुंबई

2 जुलै : जर्मनीत समलिंगी विवाहांना मान्यता देण्यात आलीय. पण इतर युरोपियन देशांच्या तुलनेत हा निर्णय घेण्यासाठी जर्मनीनं बराच वेळ लावला.

युरोपातला सर्वात बलवान देश म्हणजे जर्मनी. जागतिक राजकारणात त्याचं वजन आहे. पण सामाजिकरित्या तो तेवढा पुढारलेला आहे? 'बऱ्यापैकी' आहे, असं म्हणावं लागेल. याचं कारण असं की समलिंगी नागरिकांच्या हक्कांमध्ये तो म्हणावा तेवढा पुरोगामी नाहीय.

शुक्रवारी जर्मनीत समलिंगी विवाहांना मंजुरी देण्यात आली. जर्मन संसदेत विधेयकावर मतदान झालं आणि कायदा पास झाला. गंमत म्हणजे याआधी समलिंगी लोकांना एकत्र राहता येत होतं पण लग्न करण्यास परवानगी नव्हती. याचं कारण अर्थातच राजकीय होतं.

Loading...

जर्मनीच्या अध्यक्ष अँगला मर्कल या परंपरावादी पक्षातल्या आहेत. ख्रिश्चन डेमोक्रॅटिक पार्टी असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. त्यांचा पक्ष आणि त्या स्वतःही बऱ्याच अंशी परंपरावादी आहेत. मर्कल यांचे वडील परंपरावादी पूर्व जर्मनीत चर्चमध्ये पास्टर होते. त्याचा परिणाम मर्कल बाईंवर लहानपणी झाला असावा. म्हणूनच गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळासाठी जर्मनीच्या अध्यक्ष असूनसुद्धा हे विधेयक संसदेत त्यांनी आणलं नाही. यावर्षी जर्मनीत निवडणुका आहेत. आणि मर्कल बाई चौथ्यांदा अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. नाही म्हटलं तरी इतकी वर्षं राज्य केल्यावर जनतेत, आता बदल हवा, अशी भावना निर्माण होतेच. दुसरं म्हणजे समलिंगी संबंध आणि विवाहांना मर्कल यांचा विरोध असला तरी जनतेचा पाठिंबा आहे. निवडणुकीच्या काळात मर्कलना स्वतःची प्रतिगामी प्रतिमा निर्माण करायची नाहीय. आणि तरुणांना तर त्याहूनही नाराज करायचं नाहीय.

मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारख्या अत्याधुनिक गाड्या बनवणाऱ्या देशामध्ये आता समलिंगींसारख्या अल्पसंख्यांकानाही जास्त हक्क मिळतायेत, ही बाब कौतुकास्पदच आहे. अशावेळी आपला भारत इतका पुरोगामी कधी होणार असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2017 05:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...