S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

डॉक्टरांना आता जेनेरिक औषधांची नावंही लिहून देणं बंधनकारक

एखाद्या आजारासाठी वैद्यकीय सल्ला देणाऱ्या डॉक्टरांनी आता त्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रॅण्डेड औषध लिहून देताना, त्याबरोबरच त्या औषधाचे जेनेरिक नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना महागड्या औषधांबरोबरच आता स्वस्तातील जेनेरिक औषधे खरेदी करण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Chandrakant Funde | Updated On: Nov 25, 2017 01:23 PM IST

डॉक्टरांना आता जेनेरिक औषधांची नावंही लिहून देणं बंधनकारक

25 नोव्हेंबर, मुंबई : एखाद्या आजारासाठी वैद्यकीय सल्ला देणाऱ्या डॉक्टरांनी आता त्या आजारावर उपचार करण्यासाठी ब्रॅण्डेड औषध लिहून देताना, त्याबरोबरच त्या औषधाचे जेनेरिक नाव लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना महागड्या औषधांबरोबरच आता स्वस्तातील जेनेरिक औषधे खरेदी करण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.  ब्रॅन्डेड औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना संबंधीत कंपन्यांची औषधं लिहून देण्यासाठी एमआरमार्फत अनेक प्रलोभनं मिळत असतात. त्यामुळे डॉक्टर्स जाणिवपूर्वक जेनेरिक औषधांची नावं रुग्णांना लिहून देण्यास टाळाटाळ करतात. पण यापुढे डॉक्टरांना असं करता येणार नाही.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या वेबसाइटवर याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी औषधाचे जेनेरिक नावे वाचण्यास योग्य अशा कॅपिटल लेटर्समध्ये नमूद करणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे प्रबंधक डॉ. दिलीप वांगे यांनी स्पष्ट केले आहे.

जेनेरिक औषधांचे नाव लिहून दिल्यास रुग्णांकडे अनेक पर्याय उपलब्ध होतील तसंच ब्रॅण्डेड कंपन्यांची औषधे भरमसाट किमतीला खरेदी करायची खरंच गरज आहे का ? याचाही रुग्णाला विचार करता येईल, अशी यामागची भूमिका आहे. सध्या सरकारी रुग्णालयांत गरिबांसाठी सरकारी मोफत आरोग्यव्यवस्था असली, तरी ब्रॅण्डेड औषधांमुळे रुग्णांना मोठी किंमत चुकवावी लागते.मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग अशा आजारांवर वर्षानुवर्षे काही नियमित औषधोपचारांची गरज असते. या आजारांच्या रुग्णांना जेनेरिक औषधे उपलब्ध झाल्यास त्यांच्यावरचा आर्थिक ताण कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2017 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close