राज्यात या '5' जिल्ह्यामध्ये होणार निवडणूक, असं आहे वेळापत्रक!

36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान होणार आहे तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : राज्यात पाच जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान होणार आहे तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली. यामध्ये नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.

मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2019 पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

निवडणूक कार्यक्रम

- नामनिर्देशनपत्र सादर करणे - 18 ते 23 डिसेंबर 2019

- नामनिर्देशनपत्रांची छाननी - 24 डिसेंबर 2019

- अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे - 30 डिसेंबर 2019

- अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे - 1 जानेवारी 2020

- मतदानाचा दिनांक - 7 जानेवारी 2020

- मतमोजणीचा दिनांक - 8 जानेवारी 2020

दरम्यान, राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर मंगळवारी जाहीर करण्यात आली. आरक्षण काढताना 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. प्रवर्गाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर त्यातून महिलांचे आरक्षण देव चिठ्ठी टाकून काढण्यात आले.

मुंबईसह राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. गृहविभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. रत्नागिरी, नाशिक, साताऱ्यासह आठ जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत, लातूर जिल्हापरिषद अध्यक्षपद मागास प्रवर्गासाठी तर तर सोलापूर आणि जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, विधी व न्याय विभागाचे सहसचिव द. सं. पाटील, विमुक्त जाती, ग्रामविकास विभागाचे उपसचिव आर. ए. नागरगोजे, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग कल्याण विभागाचे उपसचिव रविंद्र गुरव, औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, चंद्रपूर जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, ठाणे जि.प. अध्यक्षा दीपाली पाटोळे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषदांचे सदस्य उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2019 08:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading