देशाचा विकास दर 5.7 टक्क्यांवर घसरला !

देशाचा विकास दर 5.7 टक्क्यांवर घसरला !

गेल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 5.7 टक्क्यांवर घसरल्याने आर्थिक विकासात भारताला चीनने मागे टाकलंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : गेल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 5.7 टक्क्यांवर घसरल्याने आर्थिक विकासात भारताला चीनने मागे टाकलंय. केंद्रीय सांख्यिकी विभागाने आज गेल्या तिमाहीतील आर्थिक विकासाचा आढावा घेतला त्यात ही बाब समोर आलीय. यापूर्वीच्या तिमाहीत हाच विकास दर 6.1टक्के होता. तर गेल्या वर्षी हाच विकास दर 7.9टक्क्यांवर पोहोचला होता. तर चीनचा वार्षिक विकास दर 6.9 टक्के इतका होता. पण नोव्हेंबरमधील नोटबंदीमुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी खीळ बसलीय. तेव्हापासून भारताच्या विकासदरात सातत्याने घट होताना दिसतेय.

देशाची आर्थिक व्यवस्था नोटबंदीच्या धक्क्यातून सावरल्यानंतर तरी विकासाचा दर वाढेल. अशी आशा व्यक्त केली जात होती. पण या तिमाहीत विकास दरात वाढ होण्याऐवजी घटच झालीय. जीएसटी लागू झाल्याने विकासावर त्याचा नकारात्मक परिणाम झाल्याचं कारण सांगितलं जातंय. गेल्या 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू झाल्याने व्यापार वृद्धीत मोठी घट झालीय.

भारत देश यापूर्वी जगभरात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत गणला जात होता. अगदी जागतिक मंदीच्या काळातही भारताच्या विकास दरावर फारसा विपरित परिणाम झाला नव्हता. पण केंद्रात मोदींचं सरकार आल्यापासून त्यांनी नोटबंदी, जीएसटी सारखे काही धाडसी निर्णय घेतलेत. त्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था सातत्याने मागे पडताना दिसतेय. रोजगार निर्मिती क्षेत्रातही त्याचा विपरित परिणाम होताना दिसतोय. असा आरोप विरोधकांनी केलाय.

First published: August 31, 2017, 8:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading