Home /News /news /

शाळेतल्या मुलांनी साजरी केली 'गटारी' पण 'दिवे' लावून!

शाळेतल्या मुलांनी साजरी केली 'गटारी' पण 'दिवे' लावून!

कल्याणमधल्या एका शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गटारी म्हणजेच दिप अमावस्येला शाळेत दिपोत्सव करत अनोख्या पद्धतीने गटारी साजरी केली.

  कल्याण, ता.10 ऑगस्ट : श्रावण संपला की खाद्य आणि मद्य प्रेमींना वेध लगतात ते 'गटारी'चे. शहरात आणि ग्रामीण भागतही गटारींच्या पार्ट्यांची आता फॅशन झालीय. महिभराचा बॅकलॉग या दरम्यान काढला जातो. चिकन,मटण,फिश आणि जोडीला पेयपान हे आता कॉमन झालंय. शोल मीडियावरून तर आता गटारी सेलिब्रेशनच्या शुभेच्छा आणि महितीही बिनधास्तपणे दिली जाते. या पार्श्वभूमीवर कल्याणमधल्या एका शाळेतल्या विद्यार्थ्यांनी गटारी म्हणजेच दिप अमावस्येला शाळेत दिपोत्सव करत अनोख्या पद्धतीने गटारी साजरी केली. आपल्या संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून दिव्यांना फार महत्व आहे. या दिव्यांचे महत्व सांगणारा, सन्मान करण्यासाठी अमावस्येला ‘दिप अमावस्या’ म्हटले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा दिवस ‘गटारी’ नावाने कुप्रसिद्ध झाला आहे. त्यामूळे संस्कृतीचे जतन करून नव्या पिढीपर्यंत ती पोहचवण्यासाठी कल्याणातील बालक मंदिर पूर्व प्राथमिक शाळेतर्फे एका चांगल्या उपक्रमाचे आयोजन केले. या शाळेने शेकडो दिवे प्रज्वलित करून ही ‘दिप अमावस्या’ साजरी केली.

  नालासोपारा स्फोटकं प्रकरणात आणखी एकजण ताब्यात

  कट्टर 'सनातन' कायम संशयाच्या भोवऱ्यात का असते?

  हल्ली ‘दिप अमावस्ये’पेक्षा गटारी संबोधून यादिवशी मद्यप्रेमींकडून मनसोक्त दारू ढोसली जाते. एरव्ही कोणतेही निमित्त नसताना मद्यपान करणाऱ्यांसाठी आजचा दिवस जणू काय हक्काचाच दिवस. मात्र या पार्श्वभूमीवर बालक मंदिर शाळेकडून संस्कृती जतन करून ती नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याच्या या प्रयत्नांचं अनेकांनी कौतुक केलंय.

  शहीद मेजर कौस्तुभ राणेंसाठी बहिणींनी आणल्या होत्या राख्या, केक आणि चॉकलेट पण...

  PHOTOS : राधिकाची इच्छा होणार पूर्ण, शनायाच्या येणार नाकीनऊ

  ‘दिप अमावस्ये’निमित्त शाळेमध्ये समई, पणती, निरांजन हे आपल्याला माहिती असणारे दिवे तर प्रज्वलित करण्यात आले होतेच. पण त्याचबरोबर पूर्वीच्या काळी वापरण्यात येणारे भुत्या, दिवटी, कंदिल, दीपमाळ, काचेचा दिवा, रॉकेलचा दिवा, पाण्यातील दिव्यांची अतिशय सुंदर आरास करण्यात आली होती. ही आरास आणि दिव्यांची पूजा पाहण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी गर्दी केली होती.  
  First published:

  Tags: Deepostave, Gatari, Kalyan, Liquor, Nonveg, कल्याण, गटारी, चिकन, दारू, दिपोत्सव, नॉनव्हेज, फिश, मटन, मद्य

  पुढील बातम्या