S M L

मुख्यमंत्र्यांसमोर औरंगाबाद महापालिकेनं अशी झाकली लाज

कचरा प्रश्न सोडवण्यात औरंगाबाद महापालिकेला यश आलेलं नाही आणि आज मुख्यमंत्री औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना कचरा झाकण्यासाठी महापालिकेला चक्क पडद्याचा आधार घ्यावा लागलाय.

Updated On: Jul 7, 2018 08:10 PM IST

मुख्यमंत्र्यांसमोर औरंगाबाद महापालिकेनं अशी झाकली लाज

औरंगाबाद,ता.7 जुलै : कचऱ्याच्या प्रश्नावरून औरंगाबाद पेटलं, पोलीस आयुक्तांची उचलबांगडी झाली, महापालिकेची अब्रू पार धुळीला मिळाली मात्र अजूनही कचरा प्रश्न सोडवण्यात औरंगाबाद महापालिकेला यश आलेलं नाही आणि आज मुख्यमंत्री औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना कचरा झाकण्यासाठी महापालिकेला चक्क पडद्याचा आधार घ्यावा लागलाय.

त्यामुळं पडद्याच्या मदतीनं औरंगाबाद महापालिकेनं स्वतःची अब्रू आणि लाज झाकली असा टोला स्थानिकांनी हाणलाय. सध्या औरंगाबादच्या किल्लेअर्क परिसरात रस्त्यालगत कचऱ्याचे ढिग जमा झालेत. दरम्यान औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीचं आणि पोलीस प्रशासकीय इमारतीच उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री शहरात आले होते. त्यांच्या नजरेपासून कचऱ्याचे ढिग लपवण्यासाठी महापालिकेनं रस्त्यालगत शेड नेटसाठी वापऱ्या जाणाऱ्या कपड्याचे पडदे लावले होते.

औरंगाबादतील कचरा समस्येला आता पाच महिने होतील. महानगर पालिका मात्र कचरा समस्या सो़वण्यात अपयशी ठरली आहे..शहराबाहेर कचरा टाकू देण्यास ग्रामस्थ तयार नाहीत त्यामुळे शहरात कच-याचे ढिग वाढू लागलेत..आता पावसाळा सुरू झाल्याने औरंगाबाद शहरात कच-यामुळे अडचणीत आणखीच भर पडली आहे

कच-याच्या समस्येमुळे महापौर हतबल झालेत..शहरात सध्या दोन ते अडीज हजार टन कचरा रसत्यावर उघडा आहे..पावसामुळे तो भीजतो आहे. त्यामुळे या प्रश्नावर तोगडा काढायचा तरी कसा असा प्रशन औरंगाबाद महापालिकेसमोर आहे.

हेही वाचा...

Loading...
Loading...

'ती'च्यात वाढ मात्र 'त्या'ची होतेय, पालकांसमोर भावनिक पेच

VIDEO : थरार, जगबुडीच्या पुरातून 80 जणांची अशी केली सुटका

VIDEO : वसईतल्या धबधब्यावर 35 जण अडकले,बचाव कार्य सुरू

विद्यार्थ्यांनो 'नीट' लक्ष द्या! आता वर्षातून दोन वेळा होणार परीक्षा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2018 08:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close