S M L

पुण्याची कचराकोंडी अखेर फुटली,फुरसुंगीवासीयांचं आंदोलन मागे

गेले बावीस दिवस हे आंदोलन सुरू होतं. मुख्यमंत्री स्वत: आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती.

Sonali Deshpande | Updated On: May 7, 2017 04:54 PM IST

पुण्याची कचराकोंडी अखेर फुटली,फुरसुंगीवासीयांचं आंदोलन मागे

07 मे : पुण्याची कचराकोंडी अखेर फुटली. फुरसुंगीवासीयांनी  14 एप्रिलपासून सुरू असलेलं त्यांचं आंदोलन मागे घेतलं. मुख्यमंत्र्यांकडूनच आंदोलन मागं घेतल्याची घोषणा करण्यात आली.

गेले बावीस दिवस हे आंदोलन सुरू होतं.  मुख्यमंत्री स्वत: आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती.

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात आज मुख्यमंत्री आणि ग्रामस्थ यांची बैठक झाली.  बैठकीला महापौर मुक्ता टिळक, सुप्रिया सुळे आणि मंत्री विजय शिवतारे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांकडे एक महिन्याचा वेळ मागितलाय.यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ' पुणे महानगर पालिकेच्या 162 वाॅर्डात कचरा कसा जिरवता येईल यासाठी आम्ही एक प्लॅन तयार करतोय. ग्रामस्थांनी अनेक मागण्या केल्या होत्या. त्याचाही आम्ही विचार करतोय.  शिवाय पाणी प्रश्न, दवाखाना प्रश्न  हेही सोडवले जातील.'

यामुळे गावकऱ्यांनी सध्या हे आंदोलन स्थगित केलंय.

ते 22 दिवस...

Loading...
Loading...

14 एप्रिल- फुरसुंगी कचरा डेपोला आग

15 एप्रिल - गावकऱ्यांची कचराबंदी, गावकऱ्यांची साखळी आंदोलनाला सुरुवात

पुण्यात अभूतपूर्व कचराकोंडी

18 एप्रिल-  मुक्ता टिळक फुरसुंगी कचरा डेपोची पाहणी केली, पुणे महापालिका प्रशासन आणि गावकऱ्यांची फोनवरून चर्चा

1 मे -  कचरा कोंडी कायम असताना पालकमंत्री बापट आणि महापौर परदेश दौऱ्यावर

3 मे - कचऱ्याची अंत्ययात्रा काढली

6 मे - विजय शिवतारेंची गावकऱ्यांशी चर्चा करुन कोंडी फोडण्याचा प्रयत्न

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2017 04:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close