गांजा तस्करांचा अफलातून फंडा, कारवाई करताना पोलिसही चक्रावले!

गांजा तस्करांचा अफलातून फंडा, कारवाई करताना पोलिसही चक्रावले!

‘झूम’ या कंपनीकडून ऑनलाईन कार बूक केली आणि त्याच कारमध्ये गांजाची तस्करी सुरू केली.

  • Share this:

हर्षल महाजन, प्रतिनिधी

नागपूर, 07 जुलै : नागपूरमध्ये गांजा तस्करी करणाऱ्यांचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये तब्बल 114 किलो गांजा क्रेटा कारसह जप्त करण्यात आला आहे. गांजा तस्कराने अफलातून फंडा वापरत गांजा लपांस करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या कारवाईमुळे सगळी भांडाफोड झाली आहे. नागपूरच्या अजनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

गांजा तष्करीचा अफलातून फंडा

नागपुरात गांजा तष्करानं अफलातून फंडा वापरला. आधी त्याने ‘झूम’ या कंपनीकडून ऑनलाईन कार बूक केली आणि त्याच कारमध्ये गांजाची तस्करी सुरू केली. गांजा तष्करीसाठी  ऑनलाईन कार बुक करण्याच्या अफलातून प्रकरणामुळे पोलीसंही चक्रावून गेले. ऑनलाईन बूक केलेल्या कारमधून 114 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

झूम कंपनीची कारंही पोलिसांनी जप्त केली आहे. 29 जूनला तष्करीच्या कारचं ऑनलाईन बुकिंग करण्यात आलं होतं अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. झूम कंपनीची ऑनलाईन कार बूक करून, त्यात गांजा तष्करीचा धक्कादायक प्रकार नागपुर शहरात उघड झाला.

29 जूनला वर्ध्याच्या हर्षल वाटकर या व्यक्तीच्या नावाने बुक असलेली ही कार आता जप्त करण्यात आली आहे. 29 जून ते 3 जुलैपर्यंत ही तष्करीची कार महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये जावून आली आहे. 3 जुलैला पोलिसांना माहिती मिळताच ही गाडी जप्त केली गेली. त्यावेळी या कारमध्ये तब्बल 114 किलो गांजा होता अशी माहिती अजनी पोलिसांनी दिली आहे.

29 जून ते 3 जुलै असं पाच दिवसांसाठी ही कार झूम कंपनीकडून बुक करण्यात आली होती. या काळात या कारमध्ये पाचंही दिवस गांजाची तष्करी झाल्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे. याच दिशेनं पोलीसांची चौकशी सुरू आहे. पण अशाप्रकारे ऑनलाईन कार बुक करून तष्करी करण्याचं देशभरात मोठं रॅकेट असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

VIDEO: धोनीला पाहायचंय? या ठाण्याच्या मॉलमध्ये!

First published: July 7, 2019, 12:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading