मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

नवी मुंबईत पुरुषावर 5 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार!

नवी मुंबईत पुरुषावर 5 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार!

सगळ्यात धक्कादायक म्हणजे आरोपी तरुणांनी पीडित पुरुषाच्या पार्श्वभागात नारळाची करवंटी आणि कंडोम टाकून त्याच्यावर अत्याचार केले आणि पळून गेले.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे आरोपी तरुणांनी पीडित पुरुषाच्या पार्श्वभागात नारळाची करवंटी आणि कंडोम टाकून त्याच्यावर अत्याचार केले आणि पळून गेले.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे आरोपी तरुणांनी पीडित पुरुषाच्या पार्श्वभागात नारळाची करवंटी आणि कंडोम टाकून त्याच्यावर अत्याचार केले आणि पळून गेले.

    वाशी, 26 सप्टेंबर : नवी मुंबईतील वाशीमध्ये बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाशीतल्या जागृतेश्वर तलावाजवळ सोमवरी सायंकाळी एका पुरुषावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 24 वर्षीय पुरुषावर 5 तरुणांनी बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे आरोपी तरुणांनी पीडित पुरुषाच्या पार्श्वभागात नारळाची करवंटी आणि कंडोम टाकून त्याच्यावर अत्याचार केले आणि पळून गेले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून वाशी पोलीस आता प्रकरणाचा कसून तपास करत आहे. पीडित आरोपीला तात्काळ कोपरखैराणेच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर नसल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. हे 5 नराधम तुर्भेमध्ये राहणारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जागृतेश्वर तलावाजवळ पीडित व्यक्ती फोनवर बोलत होता. 5 आरोपींनी तरुणाचं अपहरण करून त्याला टाटा कॉलनीतील एका अज्ञात स्थळी नेलं. त्यानंतर त्याच्यावर 5 जणांनी बलात्कार केले. बलात्कार केल्यानंतर नराधमांनी पीडित पुरुषाच्या पार्श्वभागात नारळाची करवंटी आणि कंडोम टाकत त्याचा छळ केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. इतर बातम्या - EDची नोटीशीमुळे पवारांना मिळणार 'पोलिटिकल गेन', ग्रामीण महाराष्ट्रातून पाठिंबा! पोलिसांनी 5 अज्ञातांविरोधा बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहे. तर अद्याप कोणतेही आरोपी सापडले नसल्यामुळे पीडित पुरुषाच्या कुटुंबीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता पोलीस कसा तपास करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. धक्कादायक! जुगारात पत्नीची पैज लावत हारला पती, मित्रांना घरी बोलावलं आणि...! महिलांवरील अत्याचाराचे अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुगारामध्ये पैशांची पैज लावण्याऐवजी एका व्यक्तीने चक्क पत्नीची पैज लावली आणि हारला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे संपल्यामुळे जुगारात पतीने पत्नीची पैज लावली आणि यामध्ये तो हारला. त्यानंतर महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इतर बातम्या - आघाडीचा साताऱ्यातील उमेदवार ठरला? उदयनराजेंना अशी देणार टफ फाईट! पीडित महिलेने यासंपूर्ण प्रकाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पती त्याच्या 3 मित्रांसोबत घरात जुगार खेळत होता. बऱ्याच वेळा हारल्यामुळे त्याच्याकडचे पैसे संपले आणि त्याने पत्नीचीच पैज लावली आणि त्याही खेळात तो हारला. त्यानंतर आरोपी पतीने त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. त्यासाठी पत्नीला अश्लील व्हिडिओही दाखवण्यात आला. त्यानंतर जबरदस्ती नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पीडितेकडून देण्यात आली आहे. इतर बातम्या - पुण्यासह राज्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, पाहा भीषणता दाखवणारे 'PHOTOS' दिल्लीच्या नोएडामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंबंधात पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर संपूर्ण प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहे. पुणे: पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Mumbai rape case, Rape case

    पुढील बातम्या