नालासोपारा, 18 नोव्हेंबर : मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नालासोपारा पूर्व गालानगर इथे हा प्रकार घडला आहे. आरोपी तरुणांनी मुलीचं अपहरण केल्यानंतर तिला बंधक ठेवत तब्बल 12 तास तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
17 वर्षांची अल्पवयीन तरुणी ही काही मित्रांसोबत नागेला तलावावर मॉर्निंग वॉकला गेली होती. यावेळी आरोपी तिथे गेले आणि त्यांनी तरुणीसोबत छेडछाड करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी तिला पळवून नेलं. तब्बल 12 तास 4 आरोपींनी तिच्यावर आळी-पाळीने बलात्कार केला. या सगळ्या प्रकरणामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या - ARTICAL 15: देश हादरला; 5 अल्पवयीन मुलींचं अपहरण, एकीचा सापडला मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास पीडित तरुणीने कसंबसं आरोपींच्या तावडीतून पळ काढला आणि थेट तुळींज पोलीस स्थानकात धाव घेतली. पीडित तरुणीने संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर 4 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे, अमित बाटला, रोहित मेंटल, कैलाश आणि एका अल्पवयीन तरुणावर सामूहिक बलात्कार तसंच बाल- लैंगिक अत्याचार विरोधी कायदा (पोक्सो) अंतगर्त गुन्हा दाखल करण्यात आला असून आता पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.
मोठी बातमी - सोनिया गांधींच्या बैठकीनंतर पवारांनी पुन्हा सस्पेन्स वाढवला, शिवसेनेवर म्हणाले..
दरम्यान, या सगळ्या घटनेनंतर पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. झालेल्या प्रकारामुळे तरुणीला धक्का बसला आहे तर संपूर्ण कुटुंबात भीतीचं वातावरण आहे. आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा