धक्कादायक! 8 नराधमांनी तरुणीवर केला सामूहिक बलात्कार, 10 दिवस नशा देऊन अत्याचार

धक्कादायक! 8 नराधमांनी तरुणीवर केला सामूहिक बलात्कार, 10 दिवस नशा देऊन अत्याचार

8 नराधमांनी तरुणीला रोज अमली पदार्थांचं सेवन करण्यासाठी जबरदस्ती केली आणि तिच्यावर 10 दिवस बलात्कार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

राजस्थान, 20 ऑगस्ट : तरुणीला अमली पदार्थ देऊन तिच्यावर 10 दिवस सलग सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 8 नराधमांनी तरुणीला रोज अमली पदार्थांचं सेवन करण्यासाठी जबरदस्ती केली आणि तिच्यावर 10 दिवस बलात्कार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी 2 नराधम आरोपींना ताब्यात घेतलं आहे तर इतरांचा शोध सुरू आहे.

हा सगळा धक्कादायक प्रकार राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यामध्ये घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमानगड टाऊन ठाणा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला फसवून चुरूच्या रायगड परिसरात घेऊन जाण्यात आलं. त्यानंतर तिथे तिला बांधून ठेवण्यात आलं होतं. तरुणीने आरडा-ओरड करू नये यासाठी तिला अमली पदार्थांचं सेवन करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली.

ती नशेत असताना 8 नराधमांनी तिच्यावर 10 दिवस सतत सामूहिक बलात्कार केला. राजगड पोलिसांनी याची माहिती मिळताच त्यांनी तरुणीला नराधमांच्या तावडीतून सोडवलं आणि 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर पीडित तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे तिची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.

इतर बातम्या -  प्रेमासाठी मुलीने वडिलांच्या गळ्यावर 10 वेळा फिरवला चाकू, बाथरूममध्ये जाळला मृतद

एका महिलेसह 9 जणांवर गुन्हा दाखल

तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामध्ये एका महिलेचा हात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपी महिलेसह 9 जणांवर गुन्हा करण्यात आला आहे. यातील 2 आरोपींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं असून इतर आरोपींचा शोध सूरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पीडित तरुणीला मानसिक धक्का बसला आहे. तर असं घाणेरडं कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे परिसरात तरुणींमध्ये भीतीचं वातावरण आहे.

राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: rape case
First Published: Aug 20, 2019 04:42 PM IST

ताज्या बातम्या