बाईक बिघडल्याने मुलींनी मागितली मदत, मदतीसाठी आलेल्या 11 तरूणांनीच केला बलात्कार

बाईक बिघडल्याने मुलींनी मागितली मदत, मदतीसाठी आलेल्या 11 तरूणांनीच केला बलात्कार

मुलींच्या मदतीसाठी आलेल्या 11 मुलांनी दोन मुलींवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने खबळबळ उडालीय.

  • Share this:

रांची,ता.20 ऑगस्ट : बाईक नादुरूस्त झाल्याने मुलींनी मदतीसाठी मित्राला फोन केला. मित्राने त्याच्या काही मित्रांना मदतीसाठी पाठवले. मदतीसाठी आलेल्या 11 मुलांनी दोन मुलींवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्याने खबळबळ उडालीय. 16 ऑगस्टची ही घटना असून पोलिसांनी 11 आरोपींना अटक केलीय.झारखंडमधल्या लोहरदगा भागातली ही घटना आहे. रात्री दोन अल्पवयीन मुली बाईक घेऊन फेरफटका मारायला निघाल्या. त्यांची बाईकमध्येच बंद पडली. त्यामुळे मुलींनी त्यांच्या मित्राला फोन करून मदत मागितली. त्या मित्राने त्याच्या मित्रांना घटनास्थळी पाठवले. त्यावेळी अकरा जण तिथे पोहोचले त्यांनी या दोन मुलींना निर्जन स्थळी नेले आणि बलात्कार केला. आरोपींनी मुलींजवळ असलेला फोनही हिसकावून घेतला.

17 ऑगस्टला मुलींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीसांनी टास्कफोर्स तयार केला आणि सर्व 11 आरोपींना जेरबंद केलं. त्यांच्याजवळून तो फोनही हस्तगत करण्यात पोलीसांना यश मिळवलं. या घटनेने राज्यात खळबळ उडाली असून मुख्यमंत्री रघुवर दास यांनी या घटनेची दखल घेऊन कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा...

शरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

दाभोलकरांच्या हत्येला ५ वर्षे लोटली, तरी या ५ प्रश्नांची उत्तरं अजूनही सापडली नाहीत

केरळमध्ये पाऊस थांबला, मदत कार्याला वेग आता संकट रोगराईचं

राजीव गांधी यांचे हे UNSEEN फोटो पाहिलेत का?

 

मेघाच्या पार्टीत 'शत्रू' आला पण मित्रांनीच फिरवली पाठ

First published: August 20, 2018, 11:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading