गावाकडचे गणपती : तुळजापुरातला आडातला गणपती

आडातला गणपती स्वतः पाण्यात राहून भक्तांचं संकट हरण करतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2018 05:28 PM IST

गावाकडचे गणपती : तुळजापुरातला आडातला गणपती

बालाजी निरफळ, तुळजापूर (उस्मानाबाद), 12 सप्टेंबर : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुरात तुळजाभवानीच्या मंदिराप्रमाणेच एक गणपतीचं मंदिरही प्रसिद्ध आहे. आडातला गणपती या नावाने तो प्रसिद्ध आहे. आडातला गणपती स्वतः पाण्यात राहून भक्तांचं संकट हरण करतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.

तुळजापूर शहरात गुजराती कुटुंबिय व्यास यांचा वाडा आहे. वाड्याचं संपूर्ण बांधकाम दगडी आहे. बाहेरून दिसायला जरी साधरण असला तरी या वाड्याच्या खाली दोन डझन पायऱ्या उतरून खाली गेलं की आहे गणपतीचं एक मंदीर आहे. आडातील गणपतीचं हे मंदिर 1704 सालातलं आहे. आडाचे खोदकाम करतांना व्यास कुटुंबीयांना श्री गणेशाची मूर्ती सापडली. त्या मूर्तीची स्थापना तिथेच करण्यात आली. तेव्हा पासून या गणपतीला आडातील गणपती म्हणून ओळखलं जातं.

आडातील गणपतीच्या मंदिराची रचना अष्टकोनी मंदिरा प्रमाणे असून, श्री यंत्रा मध्ये हे मंदिर बांधले आहे. मार्कण्ड पुराणात याची नोंद देखील असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात प्रवेश करायचा असेल तर आडाच्या पायऱ्या उतरून चालत जावे लागते. पाऊस चांगला झाला तर गणपतीची ही मूर्ती देखील एक महिन्यापेक्षा जास्त काळ पाण्यातच असते. या गणपतीच्या दर्शनासाठी तुम्हाला किमान 2 डझन पायऱ्या खाली उतरून जावं लागतं. तरीही भाविक अगदी मोठ्या श्रद्धेने या मंदिरात येऊन गणरायाची पूजा अर्चा करतात.

तुळजाभवानी देवीमुळे तुळजापूरला आधीच ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालंय. आडातील गणपती मंदिरामुळे या इतिहासाला आणखीन बळकटी मिळली आहे. तुळजाभवानीला येणारे असंख्य भाविक या गणपतीचे आवर्जून दर्शन घेतात असे इतिहास संशोधक भाऊ भांजी पुजारी सांगतात.

केवळ व्यवर्ध महिला व पुरुष च नाहीत तर परिसरातील अबाल वृद्ध आणि तरुण मंडळी गणेशोत्सवाच्या काळात याठिकाणी अनेक उपक्रम राबवत. या उपक्रमांमधून आनंद तर मिळतोच, शिवाय मानसिक समाधानसुद्धा मिळत असल्याचे गणेशभक्त सांगतात.

Loading...

भक्ता वर जर संकट आले तर गणपती बप्पा संकटातून तारून नेतो म्हणून त्याला विघनहर्ता म्हणतात. आडातला गणपती स्वतः पाण्यात राहून भक्तांचं संकट हरण करतो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.  आडातला गणपती स्वतः संकटात राहून भक्तांची संकटे दूर करणाऱ्या देवाकडे भक्त मोठ्या आनंदाने जातात.

 VIDEO - गणेशोत्सव विशेष : गणपतीच्या डोक्यावर चंद्र कसा आला?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2018 05:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...