
गौरी-गणपतीचा सण म्हणजे मुलींना आणि स्त्रियांना नटायचं हक्काचं निमित्त.

महाराष्ट्राचा लाडका सण गणेशोत्सव मग या सणाला साजही मराठमोळा असाच हवा. नथ, बुगडी, चंद्रकोर, कोल्हापुरी साज, नऊवारी आणि अर्थातच त्यावर शोभेल अशी कोल्हापुरी चप्पलही त्यात आलीच.

नऊवारीवर हेअरस्टाइल म्हणजे अंबाडा. मग त्यावर लावायला असा ट्रॅडिशनल खोप्यावरचा आकडा किंवा हेअर गिअर शोभून दिसेल. अभिनेत्री रुपाली भोसलेचा हा अस्सल मराठी फॅशनचा लुक त्यासाठी फॉलो करा.

नऊवारी किंवा पाचवारी साडीही नको असेल तर आर्या आंबेकरसारखा लेहंगा किंवा मराठमोळं परकर-पोलकं साडीचंही शिवता येईल. त्यावर पारंपरिक लुकसाठी नथ हवीच.

महाराष्ट्रीय खण ही सध्याची लेटेस्ट फॅशन आहे. त्यामुळे खणाची साडी, त्यावर असं ट्रॅडिशनल खण ब्लाउज असा मराठमोळा शृंगार करता येईल.

प्रिया मराठेची ही खण आणि सिव्हर नथ कॉम्बिनेशन लेटेस्ट फॅशन आणि पारंपरिक लुक यांचं मस्त कॉम्बिनेशन आहे.

गौरी-गणपतीत मिरवायला कंबरपट्टाही हवा. तर मराठी लुक पूर्ण होईल.

अंकिता लोखंडेने केलेला हा मराठमोळा लुक पाहून ज्वेलरी निवडता येईल.

नेहमीच्या नथीऐवजी जरा वेगळ्या प्रकारची नथही या गणपतीत मिरवता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.