नेहरु गांधी कुटुंबातल्या 11 व्या सदस्याची आता राजकारणात एंट्री!

प्रियांका गांधी यांना आता आपलं कतृत्व सिद्ध करुन दाखवावं लागेल. सक्रिय राजकारणात आलेल्या प्रियांका गांधी वड्रा या गांधी-नेहरु घराण्याच्या 11 व्या सदस्य आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jan 23, 2019 05:39 PM IST

नेहरु गांधी कुटुंबातल्या 11 व्या सदस्याची आता राजकारणात एंट्री!

नेहरु-गांधी घराण्याचा देशाच्या राजकारणावर मोठा प्रभाव आहे. आता प्रियांका गांधींनी राजकारणात प्रवेश केल्याने एक वर्तुळ पूर्ण झालं. आत्तापर्यंत प्रियांका या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे राहुल गांधींना मदत करत होत्या. आता त्यांना आपलं कतृत्व सिद्ध करुन दाखवावं लागेल. सक्रिय राजकारणात आलेल्या प्रियांका गांधी वड्रा या गांधी-नेहरु घराण्याच्या 11 व्या सदस्य आहेत.

नेहरु घराणं हे मुळं काश्मीरचं कौल घराणं. कश्मीरमध्ये कालवे मोठ्या प्रमाणावर आहेत. हिंदीत त्यांना 'नहर' असं म्हटलं जातं. त्यामुळे त्या 'नहर'च्या काठावर राहणारे म्हणून त्यांचं आडनाव कौलचं नेहरु असं झालं. नंतर ते अलाहाबादला स्थायिक झाले.

पंडित नेहरु यांचे वडिल मोतीलाल नेहरु यांच्यापासून या घराण्याच्या राजकारण प्रवेशाची सुरुवात झाली. ते बॅरिस्टर होते आणि स्वातंत्र चळवळीत सक्रिय होते. 1920 आणि 1929 असे दोन वेळा ते काँग्रेसचे अध्यक्षही होते.

Loading...

मोतीलालजींचा वारस आला तो पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याकडे. वडिलांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी 1912 मध्येच राजकारणात प्रवेश केला. देशाचे ते पहिले पंतप्रधान झाले. देशाच्या आणि जगाच्या राजकारणावर त्यांनी आपला ठसा उमटवला.

पंडित नेहरुंचा हा वारसा आला तो त्यांची कन्या इंदिरा गांधींकडे. काँग्रेस कार्यकर्त्या ते काँग्रेसच्या अध्यक्षा आणि नंतर देशाच्या पंतप्रधान असा त्याचा राजकारणातला चढता आलेख राहिला.

इंदिराजींचे पती फिरोज गांधीही राजकारणात सक्रिय होते. रायबरेलीमधून लोकसभेची निवडणूक लढवून ते खासदार झाले होते. राजकारणातली त्यांची भूमिका आणि इतर काही गोष्टींमुळे त्यांचं आणि इंदिराजींच फारसं पटलं नाही.

इंदिराजींनी आपला राजकीय वारसा दिला होता तो लाडगा मुलगा संजय गांधी यांच्याकडे. इंदिराजींसारखे धाडस आणि धडाडी त्यांच्याकडे होतं. अमेठीतून ते निवडुनही आले होते. मात्र 1980 मध्ये त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.

संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी मनेका गांधी 1988मध्ये राजकारणात आल्या. मात्र मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेसमध्ये न जाता काँग्रेसचे कट्टर विरोधी असलेल्या जनता दलात प्रवेश केला. तर 2004मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या नंतर केंद्रात मंत्रीही झाल्या.

संजय गांधी यांच्या मृत्यू नंतर इंदिरा गांधी यांनी राजीव गांधी यांना राजकारणात आणलं. त्यांची राजकारण प्रवेशाची इच्छा नव्हती मात्र आईच्या आग्रहाखातर ते राजकारणात आले. नंतर इंदिराजींच्या हत्येनंतर 1984मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले. नंतर त्यांनी अनेक नव्या दमांच्या तरुणांना राजकारणात आणलं.

राजीव गांधी जसं अपघाताने राजकारणात आले तसच सोनिया गांधीही राजकारणात आल्या. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या. नंतर त्या 1997 मध्ये काँग्रेसच्या सदस्या झाल्या आणि 1998मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा. नंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आणि मनमोहन सिंग 10 वर्ष पंतप्रधान राहिले.

नंतर राहुल गांधी सक्रिय झाले. 2004 मध्ये त्यांनी अमेठीतून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदार झाले. नंतर उपाध्यक्ष आणि 2018 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले

राहुल गांधी यांच्याप्रमाणेच त्यांचे चुलत भाऊ आणि मनेका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी यांनीही 2004मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये पीलीभीत मधून ते खासदार म्हणून निवडुनही आले नंतर 2014मध्ये त्यांनी सुलतानपूरमधून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2019 05:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...