गांधी हे कुटुंब नव्हे तर भारताचा DNA, काँग्रेसच्या महिला मंत्र्याने सुचवले अध्यक्षपदासाठी नाव!

गांधी हे कुटुंब नव्हे तर भारताचा DNA, काँग्रेसच्या महिला मंत्र्याने सुचवले अध्यक्षपदासाठी नाव!

पक्षाध्यक्षपदी राहाण्याची इच्छा नाही, असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. त्यामुळे आजच्या या बैठकीत सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देतील.

  • Share this:

अमरावती, 24 ऑगस्ट : काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सोनिया गांधी यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील एक गट पुन्हा एकदा राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी होत आहे. काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनीही राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावे अशी मागणी केली आहे.

काँग्रेसच्या राज्याच्या कार्यकारी अध्यक्ष तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्ष व्हावे अशी मागणी केली आहे.

'गांधी हे कुटुंब नव्हे तर भारताचा DNA आहे. राहुल गांधी यांनी पार्टीचे नेतृत्व करावं असे स्पष्ट मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्ष पदावरून चांगलच वादंग सुरू झाले आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली आहे.

सध्या काँग्रेस नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्षपदावरून चांगलेच वादंग सुरू झाले आहे. सोनिया गांधी यांची जर इच्छा नसेल तर राहुल गांधी यांनी समोर यावं त्यांच्या नेतृत्वाची देशाला गरज आहे, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्यात.

दरम्यान,  काँग्रेस कार्यकारिणीची बैठक (CWC) सुरू झाली आहे. वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष बदलावा अशी पत्राद्वारे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना मागणी केल्यानंतरच ही CWC ची ही बैठक होत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

सोनिया गांधींवरून काँग्रेसमध्ये वाद पेटला, सुनिल केदारांची आक्रमक प्रतिक्रिया

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पक्षाध्यक्षपदी राहाण्याची इच्छा नाही, असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. त्यामुळे आजच्या या बैठकीत सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात, असं राजकीय चर्चा सुरू आहे. CWC च्या या बैठकीत कॉंग्रेस नेतृत्वासह इतर प्रश्नांवरही गांधी कुटुंबीयांकडून चर्चा होऊ शकते. तर 'मी अंतरिम अध्यक्षपदाचा 1 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे आणि आता पक्षाध्यक्षपदाचा पद सोडायचा आहे' अशी माहिती सोनिया गांधी यांनी नेत्यांना दिली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काँग्रेसची कमान कोणाकडे जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Published by: sachin Salve
First published: August 24, 2020, 12:18 PM IST

ताज्या बातम्या