गावाजवळ नदीपात्रात प्राध्यापकासह मित्राचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ

गावाजवळ नदीपात्रात प्राध्यापकासह मित्राचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ

हे दोघेही मृतक गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगज तालुक्यातील रहिवासी होते.

  • Share this:

गडचिरोली, 12 मे : गडचिरोलीमधील खरकाडा गावाजवळ  नदीपात्रात दोन जणांचे मृत्यदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.   दोघांचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले असून दोघांचीही ओळख पटली आहे.

हे दोघेही मृतक गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगज तालुक्यातील रहिवासी होते. प्राध्यापक पद्यनाथ मडावी हे कुरुड येथील रहिवासी असून चंद्रपूर जिल्ह्यात निलज येथील ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होते.

हेही वाचा -वाटेतील एकही झाड न जाळता याठिकाणी पसरली विचित्र आग, VIDEO पाहून नेटकरी हैराण

प्राध्यापक पद्यनाथ मडावी यांच्यासोबत उके नामक त्यांचा मित्र होता. या दोघांचाही वैनगंगा नदीत चंद्रपूर गडचिरोलीच्या सीमेवरील खरकाडा गावाजवळ आज सकाळी मृत्यदेह आढळून आला.

हे दोघे नेमके वैनगंगा नदीत कसे बुडाले दोघांचा मृत्य कसा झाला? याबाबत तपास सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, प्राध्यापक पद्यनाथ मडावी आणि त्यांच्या मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा. त्यानंतर या दोघांचाही मृतदेह हा वाहत खरकाडा गावाजवळ पोहोचला.

हेही वाचा -अचानक घरात घुसलेल्या व्यक्तीने केलेले सपासप वार, महिलेने जागेवरच सोडला जीव

गावाजवळ मृतदेह आढळून आल्यानंतर गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. तसंच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 13, 2020, 10:36 AM IST

ताज्या बातम्या