गडचिरोली माओवादी हल्ल्यात मिलिंद तेलतुंबडेंचा हात? 18 जणांविरोधात FIR

गडचिरोली माओवादी हल्ल्यात मिलिंद तेलतुंबडेंचा हात? 18 जणांविरोधात FIR

कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर आता गडचिरोली माओवादी हल्ल्यातही मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

गडचिरोली, 05 मे : गडचिरोलीतील कुरखेडा येथे महाराष्ट्र दिनी ( 1 मे) झालेल्या भ्याड माओवादी हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचारानंतर आता या प्रकरणातही मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या 18 सदस्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

1 मे रोजी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये 15 जवान शहीद झाले होते. त्यानंतर शनिवारी ( 04 मे ) माओवाद्यांविरोधात पुराडा पोलीस ठाण्यात हत्या आणि देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता माओवाद्याच्या केंद्रीय समितीच्या 18 सदस्यांचा समावेश देखील करण्यात आला आहे.

वाचा :'बुरखा बंदी'च्या मागणीवरून संजय राऊतांची माघार, 'सामना'तून सारवासारव

2018मध्ये करण्यात आलेल्या कारवाईचा बदला?

जांभूरखेडा येथे सी-60 कमांडो जवानांचे वाहन जात असताना माओवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात एक चालक आणि 15 जवान शहीद झाले आहेत. या स्फोटात कमांडोंच्या गाडीचे अक्षरश: तुकडेतुकडे झाले. दरम्यान, माओवाद्यांनी केलेला हा हल्ला मागील वर्षीच्या माओवादविरोधी कारवाईचा बदला घेण्यासाठी करण्यात आला, असं बोललं जात आहे.

मागच्या वर्षी गडचिरोलीमध्येच माओवादविरोधी कारवाईमध्ये 16 माओवादी मारले गेले होते. 22 एप्रिल 2018 ला एटापल्लीमध्ये माओवादविरोधी पथकाने ही कारवाई तीव्र केली होती. बोरियाच्या जंगलात माओवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झालेल्या चकमकीत हे माओवादी ठार झाले होते.

वाचा : ‘राहुल गांधी तुमच्या वडिलांचा कार्यकाळ भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपला’

साईनाथ आणि सिनू ठार

या कारवाईत माओवाद्यांचा म्होरक्या साईनाथ आणि सिनू यांनाही मारण्यात आलं. माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि स्फोटकंही जप्त करण्यात आली. महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षांतली ही सर्वात मोठी कारवाई होती. माओवाद्यांनी या कारवाईचा बदला घेण्यासाठीच गडचिरोलीमध्ये हा हल्ला घडवला, याला गडचिरोलीचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनीही पुष्टी दिली आहे.

पाहा :VIDEO: 'त्या' बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं

VIDEO: बुरखा बंदीवरून संजय राऊत यांचा यूटर्न

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2019 09:43 AM IST

ताज्या बातम्या