Home /News /news /

Summer Health: उन्हाळ्याच्या दिवसाची सुरुवात करा या 5 फ्रुट सॅलडने; दिवसभर राहाल फ्रेश आणि उत्साही

Summer Health: उन्हाळ्याच्या दिवसाची सुरुवात करा या 5 फ्रुट सॅलडने; दिवसभर राहाल फ्रेश आणि उत्साही

शरीर निरोगी ठेवण्यासाठी उन्हाळ्यात आहारात बदल करणे गरजेचे आहे. अन्नामध्ये अशा गोष्टींची निवड करावी जेणेकरुन शरीर हायड्रेटेड तसेच ऊर्जावान राहते. यासाठी उन्हाळी फळं आणि सॅलड फायदेशीर ठरतात, त्याविषयी जाणून घेऊया.

    मुंबई, 21 मे : उन्हाळा सध्या शिगेला पोहोचला आहे. देशातील बहुतांश भागात तापमान 45 अंशांच्या आसपास आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागतात, दुपारी घराबाहेर पडणं हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसतं. हवामानाच्या या तीव्र बदलामुळे आपले शरीर निरोगी राखणे महत्त्वाचे आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी उन्हाळ्यात आहारात बदल करणे गरजेचे आहे. अन्नामध्ये अशा गोष्टींची निवड करावी जेणेकरुन शरीर हायड्रेटेड तसेच ऊर्जावान राहते. आज आपण काही फ्रूट सॅलड्सबद्दल जाणून घेणार आहोत, जे खाऊन आपण दिवसाची सुरुवात करू शकता. त्यामुळे आपण दिवसभर आनंदी आणि उत्साही (summer health tips) राहू शकतो. हे 5 फ्रूट सॅलड वापरून पहा 1. टरबूज सॅलड (Watermelon Salad) – उन्हाळ्यात टरबूज,कलिंगड बाजारात भरपूर येतात. या ऋतूत टरबूज खाल्ल्याने अनेक फायदे होतात. टरबूजमध्ये 90 टक्क्यांहून अधिक पाणी असते. त्यामुळे जास्त उष्णतेमध्येही शरीरातील निर्जलीकरण होत नाही. चिलगोजा, पुदिना, लिंबू इत्यादींचा वापर टरबूज सॅलड बनवण्यासाठी करता येतो. 2. डाळिंब-किवी सॅलड – डाळिंब आणि किवी ही दोन्ही अशी फळे आहेत, जी शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. या दोन्ही फळांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. हे सॅलड बनवण्यासाठी डाळिंब, किवी विथ चीज आणि पुदिन्याची पाने वापरली जातात. यामध्ये मोहरी, संत्र्याचे तुकडे, लिंबाचा रस, व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल यांचाही वापर केला जातो. 3. मिक्स फ्रूट सॅलड - मिक्स फ्रूट सॅलड बनवायला जितके सोपे आहे तितकेच ते खायलाही चविष्ट आहे. ते बनवण्यासाठी टरबूज, किवी, खरबूज आणि अननस वापरतात. प्लेट सजवण्यासाठी आपण तीळ, काजू, पुदिन्याची पाने वापरू शकता. हे वाचा - भारतात Omicron BA.4 चा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ; किती घातक आहे हा स्ट्रेन? 4. आंबा मोझझेरेला सॅलड (Mango Mozzarella Salad) - उन्हाळ्याचा हंगाम आंब्याच्या चर्चेविना असूच शकत नाही. बाजारात आंब्याची मोठी मागणी असते. सॅलड हे आंब्याइतकेच चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. त्याचा उन्हाळ्यातही आरोग्याला तितकाच फायदा आहे. सॅलड बनवण्यासाठी आंबा, मोझरेला वापरतात. लाल तिखट, आंबा, लिंबाचा रस आणि मीठ घालून आंबा मसालेदार बनवला जातो. हे वाचा - Relationship Tips: 'या' 4 सवयींच्या पुरूषांकडे अधिक आकर्षित होतात महिला 5. ब्लॅकबेरी सॅलड (Blackberry Salad) – ब्लॅकबेरी म्हणजेच जांभूळ सॅलड देखील उन्हाळ्यात खूप आवडते. ब्लॅकबेरी सॅलड तयार करण्यासाठी व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल, लिंबू, मिरची आणि चिमूटभर मीठ जांभळामध्ये मिसळले जाते. हे खूप चवदार लागते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या