आदिवासी विभागात नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची लूट,टोळी जेरबंद

आदिवासी विभागात नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची लूट,टोळी जेरबंद

विशेष म्हणजे हा सगळा प्रकार आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयातच घडलाय. अप्पर आयुक्तांच्या कार्यालयाबाहेरच हे सगळे आरोपी आपला ठाण मांडून होते

  • Share this:

02 डिसेंबर : आदिवासी विकास विभागात नोकरी देण्याचं आमिष दाखवत तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आदिवासी विभागात अधिकारी असल्याचं भासवत या आरोपींनी आत्तापर्यंत किती जणांना गंडा घातलाय याचा पोलीस तपास करतायत.

सुशिक्षीत बेरोजगार तरूण संदीप बाळू सानप या नोकरीच्या शोधात असताना त्यांची ओळख राजेंद्र सहदेव मोरे याच्याशी झाली. त्यावेळी मोरे याने सानप यांना आदिवासी विभागात नोकरी लावून देतो असं सांगितलं आणि त्यासाठी 7 लाख 50 हजार  रुपयांची मागणी केली. त्यातील 1,50,000 लाख रुपये आधी द्यावे लागतील आणि उरलेले पैसे नोकरी लागल्यावर द्यावे लागतील असं आरोपीने सांगितलं होतं.

विशेष म्हणजे हा सगळा प्रकार आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयातच घडलाय. अप्पर आयुक्तांच्या कार्यालयाबाहेरच हे सगळे आरोपी आपला ठाण मांडून होते. त्यामुळे कुणालाही यांच्यावर संशय येत नव्हता. आदिवासी विभागात कोणतेही अधिकारी नसताना अधिकारी असल्याचं भासवून या आरोपींनी बेरोजगार तरूणांना लुबाडण्याचा धंदा चालवला होता. बनावट नियुक्ती पत्रावर आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्के मारून ते पत्र या तरूणांना दिल्यावर यावर विश्वास ठेवत हे तरूण आरोपींच्या भुलथापांना बळी पडायचे, आत्तापर्यंत या आरोपींनी 7-8 जणांना अशाप्रकारे फसवल्याचं समोर आलंय.

या प्रकरणी पोलीसांनी सोमनाथ डाबल, राजेश रोहीडा, राजेंद्र मोरे, हेमचंद्र आहिरे या चार संशयीत आरोपींना ताब्यात घेतलंय. तर याप्रकरणातील आणखी एक पाचवा आरोपी साहेबराव शेवाळे अद्याप फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेतायत. अशा भुलथापांना बळी न पडता असा काही प्रकार घडला तर तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2017 09:24 PM IST

ताज्या बातम्या