गणेशोत्सवानिमित्त मोठा निर्णय, या तारखेनंतर सिंधुदुर्गात प्रवेश नाही

गणेशोत्सवानिमित्त मोठा निर्णय, या तारखेनंतर सिंधुदुर्गात प्रवेश नाही

नोकरीसाठी मुंबई आणि पुण्यात राहणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी मूळ गावी कोकणात जात असतात. पण यंदाच्या या उत्सवावर कोरोनाचं संकट आहे.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 09 जुलै : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अशात आता पावसाळा आल्याने कोरोनाचा धोका वाढणार असल्याचं चित्र आहे. अशात राज्यात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. नोकरीसाठी मुंबई आणि पुण्यात राहणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी मूळ गावी कोकणात जात असतात. पण यंदाच्या या उत्सवावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे सिंधुदूर्गात कोणालाही प्रेवश मिळणार नाहीये.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यानी गणेशोत्सवासंबंधी घेतलेल्या बैठकीचे इतिवृत्त व्हायरल झालं आहे. यामध्ये 7 ऑगस्टच्या रात्री 12 नंतर बाहेरच्या जिल्ह्यातून कुणालाही सिंधुदुर्गात प्रवेश देण्यास बंदी घालण्याचा मुद्दा लिहण्यात आला आहे. या मुद्द्यावरुन कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांमध्ये संताप पाहायला मिळतो.

पुण्यात तळीरामांनी दारू पिण्यासाठी शोधली स्मशानभूमी, अशा चालतात पार्ट्या

22 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे मुंबई, पुण्याहून मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात जातात. पण यंदा त्यांच्या जाण्यावर बंदी असल्याचं चित्र आहे. जिल्ह्यात येण्यालाठी ई-पास आवश्यक असून तो नसल्याचा कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये सतापाचं वातावरण आहे.

'पिंपरी चिंचवडमध्ये जनता कर्फ्यू नको पूर्ण शहरात कडकडीत लॉकडाऊन करा'

शिवसेनेत घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक

दरम्यान, बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये राहणं आवश्यक आहे. क्वारंटाईन राहण्यासाठी नागरिकांनी घराची क्षमता आणि काय सोयी सुविधा आहेत याची खात्री करून घ्यावी. त्यांना 14 दिवसांसाठी घराच्या बाहेर पडता येणार आहे. त्यामुळे हे लक्षात असावं अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 9, 2020, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading