फेसबुक चॅटिंगवरून मित्रांमध्ये वाद, बांबू डोक्यात घालून कवटीच बाहेर काढली...

रागाच्या भरात मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील वेहळे गावात घडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 09:45 PM IST

फेसबुक चॅटिंगवरून मित्रांमध्ये वाद, बांबू डोक्यात घालून कवटीच बाहेर काढली...

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 18 जून : मित्रासोबत झालेल्या शुल्लक वादातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार करून डोक्याची कवटीच वेगळी केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीत समोर आला आहे. रागाच्या भरात मित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील वेहळे गावात घडली आहे.

रोशन बाळकृष्ण चव्हाण ( 17 ) असं हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. आशिष रमन थळे (18)असं हल्ला केलेल्या तरुणाचं नाव आहे. डोक्यातली कवटी बाहेर आल्यामुळे रोशन हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या ठाण्यातील टायटन रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.

रोशन आणि आशिषमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्या रागातून आशिषने लाकडी मार दांड्याने रोशनच्या डोक्याच्या पाठीमागे जोरदार प्रहार केला. यात तो जागीच बेशुद्ध होत जमिनीवर कोसळला. या हल्ल्यामध्ये त्याची कवटी वेगळी झाल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे.

यावेळी स्थानिकांनी त्याला तात्काळ उपचारासाठी ठाण्याच्या टायटन रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू असून रात्री उशिराने त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या हल्ल्याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आशिष थळेच्या विरोधात भादंवि. कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, हल्लेखोर आशिष थळे फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Loading...

या प्रकरणामध्ये स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन आणि आशिष एकाच कॉलेजमध्ये इयत्ता बारावीत शिकत आहेत. त्यांच्यामध्ये फेसबुकच्या चॅटिंगमुळे वाद झाल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. त्यानुसार आता पोलिसांनी पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : मोदी लाटेत विजय मिळवलेली 'ही' खासदार तुर्कस्थानमध्ये करत आहे विवाह

स्थानिकांच्या मदतीने पोलीस आता आरोपी आशिषचा शोध घेत आहेत. तर रोशनचीही यात चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण यासाठी रोशनची प्रकृती ठीक होणं महत्त्वाचं असल्याचं रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, मैत्रित झालेल्या या वादामुळे संपूर्ण कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आशिष आणि रोशनच्या घरच्यांनाही या प्रकरणाचा धक्का बसला आहे. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

VIDEO : केतकी चितळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, 'त्या' विषयाची दिली माहिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 09:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...