कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मित्राचा गंभीर प्रकार, शिव्या घालत डॉक्टरांना बेदम मारहाण

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मित्राचा गंभीर प्रकार, शिव्या घालत डॉक्टरांना बेदम मारहाण

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मित्राने बारामती शहरातील हॉस्पिटलमध्ये घुसून एका नामांकित डॉक्टरला अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहान केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

बारामती, 11 सप्टेंबर : राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. या जीवघेण्या आजारामुळे अनेकांचा जीव गेला आहे. कोरोनाच्या या संकटात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. असाच एक भयंकर प्रकार बारामतीमध्ये समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मित्राने बारामती शहरातील हॉस्पिटलमध्ये घुसून एका नामांकित डॉक्टरला अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहान केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी जाधव याच्यावर बारामती शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री शहरातील बारामती हॉस्पिटलमध्ये पुरुषोत्तम तुकाराम गदादे यांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर शिवाजी जाधव याने हॉस्पिटलमधील कन्सल्टिंग रूममध्ये जबरदस्ती प्रवेश करून पेशंटचा मृत्यू कसा काय झाला? असा सवाल करत खालत्या पातळीची भाषा वापरली.

'उद्धव ठाकरेंनी 5 मिनिटं मराठा आरक्षणावर बोलून दाखवावं', पाटलांची जहरी टीका

यानंतर सिस्टरांना हातवारे करून त्यांनादेखील अश्लील भाषेत बोलून कन्सल्टिंग रूममध्ये असणारे डॉक्टर सुजित दामोदर अडसूळ यांनादेखील अश्लील भाषेत शिवीगाळ केली. गंभीर म्हणजे यानंतर शिवाजी जाधवने धक्काबुक्की करून डॉक्टरांना मारहाण केली. इतकंच नाही तर डॉक्टरांना बघून घेतो नंतर जिवंत सोडणार नाही असे म्हणून दमदाटी केली.

नागपूरकरांनी अडवली तुकाराम मुंढेंची गाडी, बदलीनंतर मुंबईला येताना घडला प्रकार

याबाबत डॉक्टर अजित अडसुळ यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी शिवाजी जाधव याच्यावर भा.द.वी. कलम 452, 323, 504, 509, 269, 270 साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम 2, 3, 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 11, 2020, 12:11 PM IST

ताज्या बातम्या