Home /News /news /

लग्नातील मस्ती पडली महागात! नवरीसोबत घडली भयंकर दुर्घटना; VIDEO VIRAL

लग्नातील मस्ती पडली महागात! नवरीसोबत घडली भयंकर दुर्घटना; VIDEO VIRAL

मित्रांनी नवरीबाईसोबत नको ती मस्ती केली आणि त्याचा उलटाच परिणाम झाला.

  मुंबई, 04 जानेवारी : लग्न म्हटलं की मजा-मस्ती आलीच. नवरा-नवरीला त्रास द्यायची एक संधी सोडली जात नाही. वर-वधूचे मित्रमैत्रिणी तर एकदम जोशातच असतात. पण काही वेळा त्यांची ही मस्ती चांगलीच भारी पडू शकते. सध्या अशाच एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये मजेमजेत नवरीसोबत भयंकर दुर्घटना घडली आहे. लग्नामध्ये तिच्या मित्रांनी नवरीबाईला उचललं आणि तिला हवेत उडवलं. त्यानंतर पुढे जे घडलं ते पाहूनच काळजाचा ठोका चुकतो. सर्व मिळून नवरीला उडवत राहतात. त्यानंतर तिला ते हवेत इतकं उंच उडवतात की नवरीबाईचा बॅलेन्स बिघडतो आणि ती वेगाने जमिनीच्या दिशेने येते. व्हिडीओत पाहू शकता नवरी हवेत उडत उलटी होते. तिचं डोकं खाली होतं आणि पाय वर होतात. तशाच अवस्थेत ती जमिनीवर पडते. हे वाचा - VIDEO - मगरीने केअरटेकरलाच पाण्यात खेचलं; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा नवरीला पडताना पाहून सर्वजण घाबरतात. तिला मजेत उडवणाऱ्या मित्रांनाही घाम फुटतो. ते तिला पकडायला धावतात. नवरा कसंबसं करून नवरीला वाचवतो. हुश्श त्यानंतर कुठे सर्वांच्या जीवात जीव येतो.
  आणखी थोडी जरी चूक झाली असती तर नवरीला मोठी दुखापतही झाली असती. या संपूर्ण घटनेनंतर नवरी हसताना दिसत असली तरी तिच्या चेहऱ्यावर भीतीही स्पष्टपणे दिसते आहे. ती खूप घाबरलेली आहे. हे वाचा - भारतीय नारी जगात भारी! फक्त केसांनीच खेचली तब्बल 12000 किलोची बस; पाहा VIDEO proposalspage नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. नवरीचं नशीब चांगलं म्हणून ती वाचली, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे. तर आणखी एका युझरने ज्या व्यक्तीने तिला वाचवलं, त्यासाठी देवाचे आभार मानले आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bride, Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या