अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ, अलिबाग नंतर मुंबई पोलिसांनी केला नवा गुन्हा दाखल

अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ, अलिबाग नंतर मुंबई पोलिसांनी केला नवा गुन्हा दाखल

सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचा-यांशी हुज्जत घालणे असेही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

  • Share this:

मुंबई 04 नोव्हेंबर: रिपब्लिक टीव्हीचे संपादक (Republic TV editor ) अर्णब गोस्वामी (Arnab goswami) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबाग नंतर आता मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध FIR दाखल केला आहे. पोलिसांचं पथक अर्णब गोस्वामी यांच्या घरी पोहोचल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कलम 353 नुसार अर्णब गोस्वामीवर केला गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचा-यांशी हुज्जत घालणे  असे आरोप करत  गुन्हा दाखल केला आहे.

आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले होतं. या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबागजवळील कावीर इथं आपल्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या आई कुमुद नाईक यांचाही घरात मृतदेह आढळून आला होता.  या प्रकरणी गोस्वामी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.  अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी अलिबागला नेलं आहे.

गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपने राज्यात आंदोलन केलं होतं. ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा हल्ला असल्याची टीका भाजपने केली होती. तर कायद्यापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही सर्वांना सारखाच न्याय असल्याचं काँग्रेस आणि शिवसेनेने म्हटलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 4, 2020, 7:00 PM IST

ताज्या बातम्या