Home /News /news /

परप्रांतीयांना मोफत प्रवास, मग आम्हाला का नाही?

परप्रांतीयांना मोफत प्रवास, मग आम्हाला का नाही?

नालासोपारा एसटी डेपोत गावी जाण्यासाठी चाकरमान्यांनी फॉर्म भरण्यासाठी रांगा लावल्या आहेत.

वसई, 12 मे : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मजूर आणि परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.  महाराष्ट्र सरकारकडून चाकरमान्यांना आपल्या गावी परतण्यासाठी एसटीने प्रवास करण्याची मुभा दिल्यानंतर चाकरमान्यांनी एसटी डेपोत एकच गर्दी केली आहे. राज्य सरकारकडून एसटी बसने जाण्याची व्यवस्था केल्याची माहिती मिळताच मुंबईसह उपनगरात परप्रांतीय मजुरांनी एसटी डेपोमध्ये एकच गर्दी केली आहे. नालासोपारा एसटी डेपोतही अशीच गर्दी पाहण्यास मिळाली. या डेपोत गावी जाण्यासाठी चाकरमान्यांनी फॉर्म भरण्यासाठी रांगा लावल्या आहेत. अनेक वेळा पोलीस सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करीत असले तरी त्याचं पालन केलं जात नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर परप्रांतीय नागरिकांना शासन मोफत सुविधा देत असेल तर आम्हाला ती सुविधा का नाही, असा सवाल स्थानिक चाकरमानी करत आहे. हेही वाचा - राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांचा साधेपणा, ताफा थांबवला आणि... दरम्यान, एसटी महामंडळाचे अधिकारी दिलीप भोसले यांनी, 'एसटी डेपोमध्ये गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा फॉर्म भरून दिल्यानंतर गाडीची निश्चित वेळ कळवली जाईल', असं भोसले यांनी सांगितलं. आतापर्यंत 8 हजार मजुरांना सीमेपर्यंत सोडले तर दुसरीकडे गावी जाण्यासाठी चाकरमान्यांनी मुंबई सेंट्रल स्थानकावर मोठी गर्दी केली होती. या स्थानकावर तब्बल 500च्या आसपास लोकं एकत्र आले होते. या परिसरात आता पोलिसांचाही मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे.   मुंबईतून 8 हजार मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवण्यात आले आहे. एसटी महामंडळाने आपल्या विविध आगारातील बसेसद्वारे रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे 5 हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचवले आहे. हेही वाचा - औरंगाबादमध्ये धोका वाढला! कोरोनाने घेतला 14 वा बळी तर रुग्णसंख्या 600 वर नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर अशा विविध विभागातील सुमारे 250 एसटी बसेस द्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करित चाललेल्या सुमारे 5 हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले आहे.  एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा -परब यापुढे देखील लाॅक-डाउन संपेपर्यंत अशाच कष्टकरी कामगार-मजुरांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे व तेथे अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील मजुरांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहिम एसटी महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणार आहे. तरी कष्टकरी कामगार-मजूरांनी धोकादायक पद्धतीने पायपीट न करता तुमच्या सेवेसाठी दिवस-रात्र राबत असलेल्या एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असं आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: St bus, Workers

पुढील बातम्या