Home /News /news /

पुण्यात मजुरांची फसवणूक, अधिकाऱ्यानं कोऱ्या कागदावर घेतल्या स्वाक्षरी आणि अंगठे

पुण्यात मजुरांची फसवणूक, अधिकाऱ्यानं कोऱ्या कागदावर घेतल्या स्वाक्षरी आणि अंगठे

लॉकडाऊनमध्ये मनरेगात मजुरांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे, 12 जून: लॉकडाऊनमध्ये मनरेगात मजुरांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शिनोलीच्या ठाकरवाडीत आदिवासी ठाकर समाजातील बेरोजगार मजुरांची मनरेगात फसवणूक झाली. ग्रामरोजगार सेवकानं कोऱ्या कागदावर मजुरांच्या स्वाक्षरी आणि अंगठे घेतल्या आहे. कामाची गरज असतानाही स्थानिक ग्रामरोजगार सेवकाने 9 जून रोजी मजुरांच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षरी व अंगठे घेऊन आम्हाला कामाची आवश्यकता नसल्याचे लिहून घेतलं आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी किसान सभेने केली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. हेही वाचा... तारीख पे तारीख नको, अजित दादा 'हा' निर्णय घ्या; पुण्यातल्या व्यापाऱ्यांची मागणी आंबेगाव तालुक्यातील शिनोली गावातील आदिवासी ठाकर समाजातील बेरोजगार नारिकांनी पुणे जिल्हा परिषदेकडे मनरेगा विशेष रोजगार अभियानांतर्गत ऑनलाईन अर्ज मागणी केली होती. पण मला कामाची आवश्यकता नाही, असा मजकूर स्थानिक ग्रामरोजगार सेवकाने लिहून लोकांची फसवणूक केली, असल्याचे लेखी निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अखिल भारतीय किसान सभा पुणे सचिव डॉ. अमोल वाघमारे यांनी दिले आहे. पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन मनरेगा विशेष रोजगार अभियान मे 2020 रोजी सुरू केले. यासाठी सुमारे सात हजार श्रमिकांनी कामाची मागणी केली आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील शिनोली गावातील आदिवासी ठाकर समाजातील सुमारे 25 ते 30 बेरोजगार नागरिकांनी जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या विशेष अभियानांतर्गत कामाची मागणी मे 2020 रोजी नोंदवली. परंतु अद्यापपर्यंत त्यांना काम उपलब्ध झाले नाही. हेही वाचा...पालखी प्रस्थान सोहळ्यात बाहेरील नागरिक सहभागी झाल्यास गुन्हा दाखल होणार 10 मे रोजी याच कागदाच्या वरच्या बाजुला पुणे जिल्हा परिषद यांचेकडे ऑनलाईन अर्ज एमआरजीएस मागणी केली होती, पण मला कामाची आवश्यकता नाही असा मजकूर लिहून लोकांची फसवणूक केलेली आहे. तरीही या प्रकारात सहभागी सर्व कर्मचारी व अधिकारी यांची तातडीने चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी व संबंधित कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या