लेकीची पाठवणी करण्याआधी बापाचाच संसार उद्ध्वस्त, आयुष्याची जमापुंजी जळून खाक!

लेकीची पाठवणी करण्याआधी बापाचाच संसार उद्ध्वस्त, आयुष्याची जमापुंजी जळून खाक!

सयाजी मधे यांच्या कुटुंबातील मुलीचं 12 डिसेंबरला लग्न असल्याने घरात लग्नाचा बस्ता, बाजार साहित्य, मुलीचे डाग, कुटुंबातील संसारपयोगी वस्तू आगीत जळून खाक झाल्या आहेत.

  • Share this:

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

जुन्नर, 11 डिसेंबर : जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव येथील देवजाळी इथल्या गरीब ठाकर समाजातील चार कुटुंबांची घरं आगीत जळून भस्मसात झाली आहे. गंगूबाई दुधवडे, सयाजी मधे, सिंधूबाई मेंगाळ, बबन पथवे या गरीब ठाकर समाजातील चार घरांना अचानकपणे आग लागून चारही घरं आगीत भस्मसात झाली. सयाजी मधे यांच्या कुटुंबातील मुलीचं 12 डिसेंबरला लग्न असल्याने घरात लग्नाचा बस्ता, बाजार साहित्य, मुलीचे डाग, कुटुंबातील संसारपयोगी वस्तू आगीत जळून खाक झाल्या आहेत.

मोटारसायकल घरातून बाहेर काढायला सुरज वाजगे आणि ग्रामस्थांना यश आलं. परंतु पाणी मारुन विझवायचा अनेकदा प्रयत्न करूनही पाचटाची घरे असल्याने आगीत भस्मसात झाली आहे. सुरज वाजगे, गंगाधर मुळे, गणेश पाटील, प्रदीप पाटील, नयनाताई थोरात, रामनाथ भुतांबरे, भागेश्वर पाटील व देवजाळी ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी बरेच प्रयत्न केले.

इतर बातम्या - कृरतेचा कळस! बुलडाण्यात 16 वर्षीय गतिमंद मुलीवर दोघांनी केला बलात्कार

सुरज वाजगे यांनी आमदार अतुल बेनके यांना फोनवर सगळी माहिती देताच आमदार बेनके यांनी तत्काळ तहसीलदारांना कळवून तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. ज्या मुलीचे लग्नाला सर्वतोपरी वैयक्तिक मदत करण्याचे सांगितले आहे. यावर ग्रामस्थांनी आधार देऊन सांत्वन केले.

इतर बातम्या - फायनान्स क्षेत्रातील गोव्याच्या तरुणाची मुंबईत आत्महत्या, नस कापून संपवलं आयुष्य

सरपंच वंदना राजगुरू यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून संसारोपयोगी साहित्याची मदत करणार असल्याचे सांगितले तर शिवदास विधाटे व राजूशेठ देवकर यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली आहे. दोन दिवसांवर आलेल्या लग्नाचा सर्व खर्च जुनरचे आमदार अतुल बेनके करणार आहेत. त्यामुळे या कुटुंबाच्या जीवात जीव आला आहे.

इतर बातम्या - डीएसकेंच्या अडचणीत वाढ, सांगली पोलिसांनी पत्नी आणि मुलासह येरवडा जेलमधून अटक

First published: December 11, 2019, 11:46 AM IST
Tags: pune

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading