दारूबंदीत पोलिसांनाही रहावलं नाही, धाब्यावर टाईट होऊन घातला धिंगाणा

दारूबंदीत पोलिसांनाही रहावलं नाही, धाब्यावर टाईट होऊन घातला धिंगाणा

दारू पिऊन धाब्यावर धिंगाणा घालणा-या चार पोलिसांना निलंबीत करण्यात आलं आहे. पोलिस अधीक्षकांनीच याबाबतचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

वर्धा, 22 जून : वर्धा जिल्हा तसा दारूबंदी जिल्हा आहे. दारूबंदीची जबाबदारी पोलिसांवर आहे. पण, पोलिसच दारू पिऊन धिंगाणा घालत असतील तर तुम्ही काय म्हणाल? असा प्रकार वर्धात घडला आहे. दारू पिऊन धाब्यावर धिंगाणा घालणा-या चार पोलिसांना निलंबीत करण्यात आलं आहे. पोलिस अधीक्षकांनीच याबाबतचे आदेश दिले आहेत.

प्रमोद हरणखेडे, पंढरी धुर्वे, रोशन डाहे, मनीष मांडवकर अशी कारवाई झालेल्या कर्मचा-यांची नावं आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झाल्यात. त्यात यातील कर्मचा-यांचाही समावेश आहे. तळेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत हे कर्मचारी खडका येथील राजस्थानी धाब्यावर जेवण करायला गेले होते.

तिथं त्यांनी दारू पिऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. धाब्यावर इतरही लोक जेवण करण्यास थांबल्यानं गोंधळ घालणा-यांना शांत राहण्याचं आवाहन उपस्थितांनी केलं. पण, त्यांनी सर्वांची अरेरावी करत शिवीगाळ केली.

अखेर याबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाबा गाठला. त्यावेळी पोलीस ठाण्याची गाडी येत असल्याचं पाहून पोलीस कर्मचाऱ्यांनी पोबारा केला. पोलिसांनी केलेल्या या गोंधळामुळे आपली सुरक्षा कोणाच्या हातात आहे असा प्रश्न आता वर्धाकरांना पडला आहे.

त्यातील एक कर्मचारी ठाण्यात दिसल्यानंतर त्याला ठाणेदारांनी विचारणा केली. त्याचा दारू पिऊन वास येत असल्यानं त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर चारही पोलीस कर्मचा-यांना निलंबीत करण्यात आलं आहे.

VIDEO: भाजप-शिवसेनेत पुन्हा ठिणगी, 'मुख्यमंत्री भाजपचाच होणार'

First published: June 22, 2019, 4:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading