धक्कादायक खुलासा : चारही विचारवंतांच्या हत्येचा कट रचणारे 'मास्टर माईंड' महाराष्ट्राचेच

धक्कादायक खुलासा : चारही विचारवंतांच्या हत्येचा कट रचणारे 'मास्टर माईंड' महाराष्ट्राचेच

  • Share this:

अजित मांढरे, मुंबई,ता. 21ऑगस्ट : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला अमोर काळे याने चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केला आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या चार विचारवंतांच्या हत्या या एकाच टोळीने केल्या असून त्याचे मास्टरमाईंडही एकच आहेत आणि हे सर्वजण महाराष्ट्रातलते आहेत अशी माहिती त्याने चौकशी दरम्यान दिली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर,कॉम्रेड गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि विचारवंत एम.एस. कलबुर्गी यांच्या हत्या या गेल्या पाच वर्षात काही अंतराने झाल्या. या चारही हत्यांच्या घटनेतली मोड्स ऑपरेंडी सारखीच होती. त्यामुळे या चारही हत्या एकाच कट्टर विचारसरणीतून झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

विरेंद्र तावडे आणि अमोल काळे हे कटाचे मुख्य मास्टर माईंड आहेत. या दोघांनी कट रचून त्याची अंमलबजावणीही केली असा पोलीसांचा अंदाज आहे. 'मिशन अँटी हिंदू' या नावाने यांनी योजना आखली होती. यात देशातल्या 36 जणांना टार्गेट करण्यात आलं होतं. यात महाराष्ट्रातील १६, कर्नाटक मधील १० आणि विविध क्षेत्रातील १० जण त्यांच्या रडावर होते.

दाभोलकर,पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही हत्यानंतर २ साहित्यिक, १ सीबीआयचा अधिकारी आणि एक महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी होते टार्गेटवर होते. दाभोळकरांच्या हत्येसाठी शरद आणि सचिनची नावं अमोल काळेनेच सुचवली होती.

मिशन दाभोळकर यशस्वी झाल्याने पुढील ३ हत्यांचा कट रचला गेला. विरेंद्र तावडेच्या अटकेमुळे पुढील मिशन थांबवले गेले. विरेंद्र तावडेला अटक करणारा सीबीआय अधिकारीही आणि हिंदू संघटनांवर कारवाई करणारे पोलीस अधिकाही त्यांच्या टार्गेटवर होते.

 

गडचिरोलीत पूरात अडकलेल्या सी-60 कमांडोच्या सुटकेचा थरार

First published: August 21, 2018, 9:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading