जळगाव, 12 डिसेंबर : जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील भुसावळमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चार जणांनी उंदीर मारण्याचे विष पिऊन (rate poisson) सामूहिक आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळीच या सर्वांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे चारही जणांचा जीव वाचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे प्रेरणानगर परिसरात ही घटना घडली आहे. विलास भोळे असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. विलास भोळे हे रिक्षाचालक असून त पत्नी व दोन मुलांसह गोकुळधाम रेसिडेन्सी येथे वास्तव्यास आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास विषारी औषध सेवन करून कुटुंबातील चार सदस्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन करून चौघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
...अन् सचिनने चाखली महाराष्ट्राची नंबर 1 मिसळ, VIDEO व्हायरल
पण, परिसरातील नागरिकांच्या सदर प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चारही जणांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. उपचाराअंती या चार जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घरगुती वादातून विलास भोळे यांनी हे कृत्य केले असावे अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
माथेरानमध्ये आढळला महिलाचा मृतदेह
दरम्यान, माथेरानमध्ये (Matheran) एक भयानक घटना समोर आली आहे. एका महिलेचा निर्वस्र अवस्थेत शिर नसलेला मृतदेह (dead body) आढळून आला. संबंधित घटना ही आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. घटना उघड झाल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
चार महिन्यांपासून पगार नाही, अनेकांना वाचवणाऱ्या योद्ध्यांवर उपासमारीची वेळ
ही धक्कादायक घटना काल रात्री उशिरा घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना उघड झाली. माथेरान रेल्वे स्थानकासमोरील एका बंद खोलीत हा मृतदेह सापडला. धक्कादायक म्हणजे ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला, त्या ठिकाणी सहसा कुणी जात नाही, असे सांगितले जात आहे. महिलेसोबत एक पुरुषही फिरायला आला होता, अशी माहिती स्थानिकांकडून मिळत असल्याचे सांगितले जात आहे. या खोलीत कोणतीही बॅग अथवा काहीही पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे महिलेची ओळख पटवणे कठीण आहे, असेही सूत्रांनी सांगितले. या घटनेचा तपास माथेरान पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.