इंदापूरच्या उजनी बॅकवॉटर अपघातातले चारही मृतदेह सापडले

इंदापूरच्या उजनी बॅकवॉटर अपघातातले चारही मृतदेह सापडले

सुट्टीनिमित्त गावी फिरायला आलेल 10 डॉक्टर उजनी बॅक वॉटरमध्ये बोटीतून प्रवास करत होते.

  • Share this:

इंदापूर तालुक्यातील अजोती गावाजवळ भीमा नदीच्या उजनी बॅक वॉटरमध्ये वाहून गेलेल्या चारही बेपत्ता डाॅक्टरांचा मृत्यू झाला आहे.

सुट्टीनिमित्त गावी फिरायला आलेल 10 डॉक्टर उजनी बॅक वॉटरमध्ये बोटीतून प्रवास करत होते. ही बोट बुडाल्यानंतर 10 डॉक्टरांपैकी सहा डॉक्टर कसेबसे पाहून पाण्याबाहेर आले. तर काल आणि आजच्या शोधकार्यानंतर चौघांचा मृतदेह बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे.

हे सर्व डॉक्टर्स सोलापूर जिल्ह्यातील  माळशिरस तालुक्यातील आहेत. एनडीआरफची टीम अजूनही या ठिकाणी दाखल झालेली नाही. हे मृतदेह शोधण्यासाठी गावकरी आणि मच्छिमारांची मदत घेण्यात आली होती.

अकलूजचे डॉ. सुभाष मांजरेकर, तर नातेपुतेमधील डॉ.महेश लवटे, डॉ. अण्णासाहेब शिंदे, आणि डॉ. उराडे  हे चारही डॉक्टर्स पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडले आहेत. तर माळशिरसचे डॉ. दिलीप तुळशीराम वाघमोडे , डॉ.  प्रवीण श्रीरंग पाटील आणि डॉ. दत्तात्रय भगवान सर्चे, तर अकलूजचे डॉ. अतुल विनोदकुमार दोशी, डॉ. श्रीकांत नंदकुमार देवडेकर, डॉ. समीर अशोक दोशी या सहा डॉक्टरांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं आहे.

उजनी दुर्घटनेचा घटनाक्रम

- 4 वाजता - 10 डॉक्टर एका होडीतून उजनीच्या पाण्यात फिरायला गेले

- मच्छिमाराच्या फायबरची बोटची क्षमता फक्त 6 माणसं बसण्याची

- पण बोटीमध्ये प्रत्यक्षात मच्छिमारासह 11जण बसले

- बोटीमधल्या कोणाकडेच लाईफ जॅकेट नव्हते

- वजन न पेलल्याने 5 वाजेच्या सुमाराला बोट बुडाली

- बुडालेल्या पैकी मच्छीमारासह 7 जण पोहून बाहेर आले

- एनडीआरएफला चारही मृतदेह बाहेर काढण्यास यश

- 4 मृत डॉक्टर्स अकलूज, माळशिरस, नातेपुतेचे रहिवासी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2017 11:25 AM IST

ताज्या बातम्या