काँग्रेस आणि जेडीएसचे चार आमदार 24 तासांपासून 'नॉटरिचेबल'

काँग्रेस आणि जेडीएसचे चार आमदार 24 तासांपासून 'नॉटरिचेबल'

काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्षचे 4 आमदार गेल्या 24 तासांपासून नॉटरिचेबल असल्यानं काँग्रेस आणि जेडीएसच्या गटात चिंतेचं वातावरण आहे.

  • Share this:

बंगळुरू,ता.17 मे: कर्नाटकमध्ये येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता सगळं लक्ष भाजप आमदारांचं गणित कसं जुळवून आणतं याकडे लागलंय. बहुमतासाठी भाजपला 8 आमदारांची गरज आहे.

एका अपक्ष आमदाराने भाजपला पाठिंबा दिल्याचं सांगितलं असलं तरी अजुन 7 आमदार भाजपला लागणार आहेत. काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्षचे 4 आमदार गेल्या 24 तासांपासून नॉटरिचेबल असल्यानं काँग्रेस आणि जेडीएसच्या गटात चिंतेचं वातावरण आहे.

या दोनही पक्षांनी आपल्या सर्व आमदारांना बंगळुरूजवळच्या एका अलिशान रिसॉर्टमध्ये ठेवलं असून या खेळात तज्ज्ञ असलेली खास माणसं आमदारांवर करडी लक्ष ठेवून आहेत. असं असतानाही चार आमदार नॉट रिचेबल होताच कशी असा प्रश्न निर्माण होतोय. या आमदारांना कर्नाटकबाहेर हलवण्याचीही योजना असून त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2018 04:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading