केजरीवालांच्या मदतीसाठी ममतादीदी-कुमारस्वामींसह 4 मुख्यमंत्री आले धावून !

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी पाठिंबा दिलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2018 10:19 PM IST

केजरीवालांच्या मदतीसाठी ममतादीदी-कुमारस्वामींसह 4 मुख्यमंत्री आले धावून !

नवी दिल्ली, 16 जून : दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या घरी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या नेत्यांचं आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनात चार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उडी घेतलीये. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी पाठिंबा दिलाय.

आज संध्याकाळी केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी पोहोचले आणि त्यांनाही बैजल यांनी भेटण्यासाठी परवानगी दिली नाही.

त्यावर केजरीवाल यांनी टि्वट करून, हे सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सागण्यावरून होत आहे. उपराज्यपाल हे स्वत: चा निर्णय घेत नाहीये. ते पंतप्रधानांच्या आदेशावर चालताय अशी टीका केजरीवाल यांनी केली.

दिल्लीत आयएएस अधिकाऱ्यांनी संप पुकारलाय. हा संप मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, गोपाल राय आणि सत्येंद्र जैन यांच्यासह गेल्या सहा दिवसांपासून उपराज्यपालांच्या कार्यालयात उपोषणाला बसले आहे.

दरम्यान, केजरीवाल यांच्यासह  मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय यांच्याविरोधात उपराज्यपाल यांचे काम थांबवल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आलाय.  विभोर आनंद यांनीही  तक्रार दाखल केलीये. केजरीवाल यांच्याविरोधात IPC कलम 124 अंतर्गत तक्रार करण्यात आली असून जामीन मिळणार नाही. तसंच 7 वर्षापर्यंत शिक्षाही होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2018 10:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...