मुलींची छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांना मारहाण करून काढली धिंड

मुलींची छेड काढल्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांना मारहाण करून काढली धिंड

मुलीला त्रास देतो असा पालकांचा गैरसमज झाल्याने त्यांनी दोन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करून त्याची मावळे आळी परिसरात नग्नाअवसथेत धिंड काढली.

  • Share this:

19 मे : पुण्यातील वारजे भागात दोन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करून त्याची नग्नावस्थेत धिंड काढल्याची धक्कादायक घटना वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे.

मुलीला त्रास देतो असा पालकांचा गैरसमज झाल्याने त्यांनी दोन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण करून त्याची मावळे आळी परिसरात नग्नाअवसथेत धिंड काढली.

या प्रकरणात पीडित मुलाच्या आईच्या तक्रारी वरून वारजे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. नवीन खुराणा, यश खुराणा, राजू देवाशी आणि प्रदीप साळुंखे असं अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नाव आहेत.

पीडित मुलगा आणि नवीन खुराणा याची मुलगी हे कोथरूड येथील एकाच शाळेत शिकतात, त्यामुळे त्याची चांगली मैत्री आहे. मात्र, पीडित मुलगा हा आपल्या मुलीला त्रास देतो तसंच या परिसरात वारंवार फिरायला येतो असा गैरसमज झाल्याने आरोपी नवीन खुराना याने पीडित मुलांना बेदम मारहाण करून त्याची नग्नाअवस्थेत धिंड काढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2017 04:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading