मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

जगातील 48 देश कोरोनाच्या विळख्यात, इराणच्या उपराष्ट्रपतींना आजाराची लागण

जगातील 48 देश कोरोनाच्या विळख्यात, इराणच्या उपराष्ट्रपतींना आजाराची लागण

आतापर्यंत कोरोनामुळे 2,802 जण मरण पावले आहेत. तर 82,059 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे

आतापर्यंत कोरोनामुळे 2,802 जण मरण पावले आहेत. तर 82,059 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे

आतापर्यंत कोरोनामुळे 2,802 जण मरण पावले आहेत. तर 82,059 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे

  • Published by:  Meenal Gangurde

तेहरान, 28 फेब्रुवारी : चीननंतर जगातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरत आहे. यामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणच्या उपराष्ट्रपती मसूमेह इब्तेकर यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्य़ाची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत इराणमध्ये 245 जणांना कोरोनाची लागण झाली असून मृत्यूचा आकडा 26 वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती इराणच्या आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

हेही वाचा - VIDEO : कोरोनाचा कहर असतानाही रुग्णालयातील परिचारिकांनी का केला डान्स?

हेही वाचा - कोरोनाच्या विळख्यातून अखेर 'त्या' भारतीयांची सुटका; सरकारचं मोठं पाऊल

कोरोना पसरतोय

आतापर्यंत जगातील तब्बल 48 देशांतील नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यापैकी 40 हून अधिक देशांनी हाय अलर्ट घोषित केले आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 2,802 जण मरण पावले आहेत. तर 82,059 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. चीननंतर दक्षिण कोरिया आणि इराणमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.

WHO कडून नियंत्रणाचे संकेत

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्व देशांना कोरोना व्हायरस रोखण्यासाठी योग्य ते पाऊल उचलण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी, असंही जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

भारतात चीन आणि दक्षिण कोरिया या देशांतून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात होते. या आयातीवरही कोरोना व्हायरसचा परिणाम झाला आहे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूही महाग झाल्या आहेत. चीनमधल्या वुहान प्रांतात कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्यानंतर चीनमध्ये परिस्थिती भीषण झाली होती. चीन आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये सॅमसंग, LG या कंपन्यांचं इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं उत्पादन होतं. नेमक्या याच देशांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे.

First published:

Tags: Coronavirus, Iran